घरपालघरदिवाळीची सुट्टी ठरली एसटीला लाभदायक,उत्पन्नात भरघोस वाढ

दिवाळीची सुट्टी ठरली एसटीला लाभदायक,उत्पन्नात भरघोस वाढ

Subscribe

त्याचा प्रवासासाठी एसटीकडे कल असला तरी ह्या वर्षी कोकणात जाणार्‍या ट्रेन पालघर स्थानकात थांबू लागल्याने एसटीमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी ट्रेनचा पर्याय स्वीकारला असलातरीही त्याचा फटका एसटीला बसलेला नसल्याचे पालघर आगाराकडून सांगण्यात आले.

नदीम शेख,पालघर: याआधी एसटी कर्मचार्‍यांनी मागण्यांसाठी संप केल्याने ऐन सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाला मोठ्या महसुलाला मुकावे लागते होते. मात्र यंदा एसटी महामंडळाने दिवाळी सुट्टयांमध्ये एसटीच्या जादा फेर्‍या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाला दिवाळीनिमित्त चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग पालघर अंतर्गत पालघर बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा व नालासोपारा असे एकूण आठ आगार असून या आगारातून दररोज एसटी बसच्या सुमारे 3374 फेर्‍या केल्या जातात. ह्या फेर्‍यांमधून 1 लाख 43 हजार किलोमीटरचा प्रवास साधला जात असून ह्या प्रवासातून पालघर विभागाला दररोज सुमारे 58 ते 60 लाख रुपयाचे उत्पन्न मिळत असते. दिवाळीच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यात नोकरी, व्यवसाय, रोजगार निमित्ताने आलेले हजारो चाकरमानी आपल्या गावाकडे कोकण, कोल्हापूर, सांगली, नंदुरबार आदी जिल्ह्यांतील आपल्या गावाकडे जात असतात. पालघरच्या आठ आगारातून ९५ लांब पल्ल्याच्या एसटी बसेस जात असून दिवाळी साठी अतिरिक्त १९ फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत.त्याचा प्रवासासाठी एसटीकडे कल असला तरी ह्या वर्षी कोकणात जाणार्‍या ट्रेन पालघर स्थानकात थांबू लागल्याने एसटीमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी ट्रेनचा पर्याय स्वीकारला असलातरीही त्याचा फटका एसटीला बसलेला नसल्याचे पालघर आगाराकडून सांगण्यात आले.

नियोजनामुळे फायदा

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग पालघर अंतर्गत एकूण आठ आगार असून त्यातील सफाळे आगार वगळता अन्य सात आगारातून एकूण १९ जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे. बोईसर आगारातील बोईसर-कोल्हापूर व बोईसर-सांगली ह्या मार्गावर २१ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान नियोजित फेर्‍या व्यतिरिक्त अतिरिक्त जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर ह्या दरम्यान ११ दिवस दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नियोजित फेर्‍यांचे आरक्षण पूर्ण झाल्यास १५ मिनिटाच्या अंतराने जादा बस सोडण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -