घरपालघरमहापालिका कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मंजूर

महापालिका कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान मंजूर

Subscribe

. यंदाची दिवाळी ही सर्व कर्मचार्‍यांसाठी आनंददायी व सुख समृद्धीची जावो याकरिता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा आयुक्त यांनी नमूद केले.

भाईंदर : मिरा -भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेतील सर्व पालिका अधिकारी कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदान देणेबाबत १२ ऑक्टोबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली. त्यात गतवर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढीव सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांच्या कोरोना काळापासून मिरा- भाईंदर महानगरपालिका कर्मचारी यांना दिवाळी सानुग्रह अनुदानात वाढ केली नव्हती.त्यामुळे कर्मचार्‍यांना दिवाळी सानुग्रह अनुदानात वाढ व्हावी, अशी बर्‍याच कामगार संघटनांची मागणी होती व तसे निवेदन प्राप्त झाली होती.
सदर मागणीचा विचार करून व कर्मचार्‍यांचा उत्साह वाढविण्यासाठी मा. आयुक्त यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना १० टक्के वाढीव सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाची दिवाळी ही सर्व कर्मचार्‍यांसाठी आनंददायी व सुख समृद्धीची जावो याकरिता हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा आयुक्त यांनी नमूद केले.
दिवाळी सानुग्रह अनुदानात वाढ केल्याने महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व कर्मचार्‍यांनी तसेच सर्व कामगार संघटनांनी आयुक्त दिलीप ढोले यांचे आभार व्यक्त केले. सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे, रवी पवार, मुख्य लेखापरीक्षक मंजिरी डिमेलो, मुख्य लेखाधिकारी अजित कुलकर्णी हे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -