घरपालघरपाण्याचे राजकारण करू नका

पाण्याचे राजकारण करू नका

Subscribe

म्हणण्यानुसार 17 गाव पाणीपुरवठा समिती सक्षम नसल्याने ती बरखास्त करून ही योजना जिल्हा परिषद पाणीपुरवठाकडे वर्ग करावी अशी मागणी ही खासदार गावीत यांनी केली.

सफाळे: सफाळे उंबरपाडा नंदाडे 17 गाव पाणीपुरवठ ाया योजने संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांनी 17 गावचे लोकप्रतिनिधी सरपंच सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांची नुकताच बैठक आयोजित करून पाण्याला जात धर्म नसतो पाण्याबाबत राजकारण करू नका अशा सूचना प्रशासन व अधिकारी यांना दिल्या. एकूण थकबाकी वीज बिलावरील व्याजदर व इतर आकार कर शासनच्या ओटीएस योजने अंतर्गत कमी करून उर्वरित वीजबिल आपल्या सर्वांच्या सामाजिक दायित्वातून थकित वीज बिलाचा प्रश्न सोडवूया असे आव्हान करून स्वतः राजेंद्र गावित यांनी वैयक्तिक सहा लाख रुपयांचा निधी देऊन उर्वरित 4 लाख 16 हजार 620 रुपये सफाळे टेंभीखोडावे, मांडे, विराथन बुद्रुक,करवाळे, जलसार, माकणे, कांद्रेभुरे, वाढीव, नवघर घाटीम,कर्दळ, इत्यादी गावांच्या कर व लोकवर्गणीच्या माध्यमातून देऊन थकित बिलाचा प्रश्न मार्गी लावला. 17 गावे ग्रामस्थ व सरपंच लोकप्रतिनिधी यांच्या म्हणण्यानुसार 17 गाव पाणीपुरवठा समिती सक्षम नसल्याने ती बरखास्त करून ही योजना जिल्हा परिषद पाणीपुरवठाकडे वर्ग करावी अशी मागणी ही खासदार गावीत यांनी केली.

सदर बैठकीस सभापती शैला कोळेकर, पंचायत समिती पालघर, विनया पाटील, जि.प.सदस्या, धोडी व सिमा , प. समिती सदस्या व 17 गावचे सरपंच, उप सरपंच, सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगताप, महाराष्ट्र जलजीवन प्राधिकिरणाचे अधीक्षक अभियंता कांबळे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता, निवडुंगे, महाराष्ट्र वीज मंडळ कार्यकारी अभियंता जरग, उप अभियंता कदम, भैतुले, गटविकास अधिकारी, रेवंडकर, नायब तहसीलदार पूजा भोईर सह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -