घरपालघरश्वान निर्बिजीकरण कंत्राट ?नको रे बाबा

श्वान निर्बिजीकरण कंत्राट ?नको रे बाबा

Subscribe

गेल्या आठवड्यातच शहरात एका दिवसात अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिक भटक्या कुत्र्यांना आवरण्याची मागणी करत आहेत.

वसईः वसई – विरार महानगरपालिका हद्दीत जवळपास ५० हजारांहून भटकी कुत्री असून त्यापासून वसईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. जवळपास तेरा वर्षे होत आली असतानाही महापालिका श्वान निर्बिजीकरण केंद्र तयार करण्यात अयशस्वी ठरली आहे. हद्दीत दोन जागा श्वान निर्बिजीकरण केंद्रासाठी बघितल्या असल्या तरी याठिकाणी ती केंद्रे चालवण्यासाठी ठेकेदार येत नसल्याने महापालिका हतबल झाली आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून श्वानांच्या निर्बिजीकरण व रॅबिज लसणीकरण करण्यात येत असते. महापालिका स्थापनेपूर्वी तत्कालीन नवघर माणिकपूर नगरपालिकेने श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारले होते. महापालिका झाल्यानंतर ते केंद्र महापालिकेत समाविष्ट झाले. परंतु महापालिका झाल्यावर एकही केंद्र प्रशासनाला उभारता आलेले नाही. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्याचा ठराव करण्यात आला होता. सुरुवातीला जागा नसल्याचे कारण पुढे आले होते. तर आता दोन ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यापासून त्यासाठी टेंडर काढण्यात आले असले तरी त्याला ठेकेदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. महापालिका क्षेत्रात असलेल्या एकमेव श्वान निर्बिजीकरण केंद्राचे काम मे. युनिव्हर्सल निमल वेल्फेअर ही संस्था करत होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हे केंद्रही बंद पडले आहे. गेल्या आठवड्यातच शहरात एका दिवसात अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिक भटक्या कुत्र्यांना आवरण्याची मागणी करत आहेत.

०००

- Advertisement -

श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आम्ही दोन जागाही बघितल्या असून टेंडरही काढले आहे. परंतु केंद्र चालवण्यासाठी अजून कोणी ठेकेदार पुढे आलेला नाही. लवकरच चांगला ठेकेदार मिळवून प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्याचा प्रयत्न असणार आहे.

— अनिलकुमार पवार , आयुक्त
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -