घरपालघरकंपन्यांची वकिली करू नका, कामगारांच्या कुटुंबाला न्याय द्या

कंपन्यांची वकिली करू नका, कामगारांच्या कुटुंबाला न्याय द्या

Subscribe

जखमी कामगारांना चांगले उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकार्‍यांना केल्या.त्यानंतर त्यांनी दुर्घटनाग्रस्त कारखान्याला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. औद्योगिक सुरक्षा संचालनालय आणि कंपनी व्यवस्थापनाकडून स्फोटा मागची कारणे जाणून घेतली.

बोईसर: कंपन्यांची वकिली करू नका, स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला न्याय देण्याचे काम करा,असा सज्जड दम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या अधिकार्‍यांना दिला. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे अधिकारी काम करीत नसल्याने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये स्फोट आणि अपघात होत आहेत. यात निष्पाप कामगारांचे बळी जात असल्याचा आरोप त्यांनी केला.बुधवारी तारापूर औद्योगिक वसाहती मधील स्फोटात जखमी झालेल्या कामगारांची विचारपूस करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तारापूर औद्योगिक वसाहतीच्या दौर्‍यावर आले होते. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बुधवारी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरीया इंडस्ट्रीज कंपनीमधील स्फोटात जखमी झालेल्या कामगारांची भेट घेतली. सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास बोईसरमध्ये दाखल झालेल्या अंबादास दानवे यांनी थेट शिंदे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचारासाठी दाखल असलेल्या श्रावण दास नामक जखमी कामगाराची भेट घेत त्याची विचारपूस केली.जखमी कामगारांना चांगले उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकार्‍यांना केल्या.त्यानंतर त्यांनी दुर्घटनाग्रस्त कारखान्याला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. औद्योगिक सुरक्षा संचालनालय आणि कंपनी व्यवस्थापनाकडून स्फोटा मागची कारणे जाणून घेतली.

त्यांनी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकार्‍यांची खरडपट्टी काढत कंपनीची बाजू न घेता सर्वसामान्य कामगारांची बाजू घेण्याची तंबी दिली.अधिकार्‍यांच्या उत्तराने संतप्त झालेल्या दानवेंनी स्फोटातील कामगारांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर का दाखल करू नये ? असा सवाल उपस्थित केला.कंपनीमधील उत्पादन प्रक्रिया,रिअ‍ॅक्टरची संख्या आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू असताना रिअ‍ॅक्टरवर काम करण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल कर्मचारी नेमले होते का? याची माहिती घेण्याची तसेच तसे नसल्यास कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली. कंपनी झालेल्या स्फोटानंतर दुर्घटना ग्रस्त रिअ‍ॅक्टर आणि रसायनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.दोन आठवड्यात अहवाल येणार असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे क्षेत्र अधिकारी अधिकारी अमोल बाइत यांनी दिली. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील सतत होणारे स्फोट आणि अपघात रोखण्यासाठी विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन दानवे यांनी यावेळी दिले. स्फोट,जखमी तसेच मयत कामगारांची संख्या आणि स्फोटाच्या कारणांच्या माहितीसाठी बोईसर पोलिसांनी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकार्‍यांकडे पत्र व्यवहार केल्यानंतरही माहिती दिली जात नसल्याची तक्रार यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -