घरपालघरस्वयंसेवक डॉ. उमेश पै यांचे निधन

स्वयंसेवक डॉ. उमेश पै यांचे निधन

Subscribe

विश्व हिंदू परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. ठाणे, पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरच भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषदेच्या विस्तारात डॉ. पै यांचा सिंहाचा वाटा आहे.

वसई : विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ. उमेश पै यांचे मंगळवारी दीर्घ आजार आणि वृद्धापकाळामुळे मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मी, पुत्र ज्ञानेश, बंधू रमेश व डॉ. दिनेश असा मोठा परिवार आहे. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर वसईत संध्याकाळी चार वाजता पाचूबंदर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वसईतील पहिले हॉटेल उद्योजक आणि समाजसेवक दिवंगत वासुदेव पै यांचे ते द्वितीय पुत्र होते. वसई भाजपचे माजी अध्यक्ष रमेश पै यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. वसईतील पै घराणे मुळचे काँग्रेसी.मात्र एमबीबीएस असलेले डॉ. उमेश पै हे १९६५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरच भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यास वाहून घेऊन, २००२ पासून तर डॉक्टरकीच्या व्यवसायावर तुळशीपत्र ठेवत विश्व हिंदू परिषदेच्या कामात ते पूर्णवेळ सक्रिय झाले. विश्व हिंदू परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. ठाणे, पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरच भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषदेच्या विस्तारात डॉ. पै यांचा सिंहाचा वाटा आहे.

भारतीय जनता पक्षाची वसईत स्थापना झाल्यानंतर १९८० साली झालेल्या वसई विधानसभा निवडणुकीचे डॉ. उमेश पै पक्षाचे पहिले उमेदवार होते. आणिबाणीच्या १९७५ साली झालेल्या सत्यागृहात पै यांनी एक महिना तुरुंगवास भोगला होता. १९९० आणि १९९२ साली झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवेत वसईतून गेलेल्या आंदोलकांचे नेतृत्व डॉ. पै यांनी केले होते. १९९७ ते १९९९ अशी तीन वर्षे भाजपचे जिल्हा संघटनमंत्री म्हणून त्यांनी धुरा वाहिली. उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पै यांचे महत्वाचे योगदान असे. वसईत खासदार म्हणून काम करताना डॉ. पै यांच्याकडे राम नाईक नेहमीच विश्वासू सहकारी म्हणून बघत. डॉ. पै यांचा व्यापक जनसंपर्क व तळागाळातील नागरिकांशी असलेले नाते यामुळे वसईत भारतीय जनता पक्षाचे काम रुजवण्यास मोठीच मदत झाली. झोकून निःस्पृह कार्य करणारे डॉ. पै कायम स्मरणात राहतील, अशा शोकभावना राम नाईक यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -