घरपालघरहायवेवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

Subscribe

मीरा भाईंदर शहराप्रमाणे मुंबई-अहमदाबाद हायवेवरील रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले असून त्यांना अनेकदा अपघाताना देखील समोर जावे लागत आहे.

मीरा भाईंदर शहराप्रमाणे मुंबई-अहमदाबाद हायवेवरील रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले असून त्यांना अनेकदा अपघाताना देखील समोर जावे लागत आहे. त्याचबरोबर खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवल्याने पाठीचा त्रास, मान दुखी, मनक्याचा त्रास अशा अनेक शरीराच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहनचालक नाराजगी व्यक्त करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसाचा फटका मीरा भाईंदरमधील रस्त्यांना त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद हायवेच्या रस्त्यांना देखील बसला आहे. मीरा-भाईंदर शहरात रस्ते डांबरी करण्याचे काम सुरु झाले होते. मात्र जोरदार पडणाऱ्या पावसाने शहरात काही ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर सगनाई माता मंदिर, फाउंटेन, वर्सोवा या हायवेच्या रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दिवसभरात या हायवेवरुन हजारो वाहनांची ये-जा सुरु असते. रस्त्यावर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

खड्डेमय रस्त्यांमुळे एखाद्याचा अपघात होऊन कोणतीही इजा पोहोचू नये, याकरता काशिमीरा वाहतूक पोलिस दररोज हायवेची पाहणी करत असून ज्याठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असतील, त्याठिकाणी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून रस्त्यावर डांबरीकरण करून घेत आहेत.

लॉकडाउनच्या काळात सर्व सामान्यांकरता रेल्वे बंद असल्याने कामावर जाणारे स्वतःच्या वाहनांसह सार्वजनिक वाहनांचा अधिकतर वापर करत असल्याने हायवेवर वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणत दिसत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि मोठाले खड्डे यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना आता पाठदुखी, मानदुखी, मणक्याचे दुखणे असा आजाराची लक्षणे जाणवू लागली आहेत. लॉकडाऊन असल्याने रेल्वेला पर्यायी रस्ता वाहतूक हाच एकमेव मार्ग आहे. पण, देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणाऱ्या मुंबई-अहमदाबाद या देशातील मुख्य महामार्गाचीही वाताहात झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

असंघटित कामगार अनुदानापासून वंचित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -