घरपालघरदगडखाणींमुळे घरांना तडे, रस्त्याची दुर्दशा

दगडखाणींमुळे घरांना तडे, रस्त्याची दुर्दशा

Subscribe

विशेष म्हणजे पेसा गाव असलेल्या ग्रामपंचायतीने याबाबत तक्रारी करून देखील महसूल विभागाकडून या खदानींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

वसई : वसई तालुक्यातील आडणे-भिनार ग्रामपंचायत हद्दीत सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे दगड खाणी आणि क्रशर मशीन सुरू आहेत. खाणीत केल्या जाणार्‍या सुरुंग स्फोटामुळे येथील आदिवासींच्या घरांना तडे गेले आहेत. शिवाय अवजड वाहतुकीमुळे गावातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, धुळीमुळे येथील शेती आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे पेसा गाव असलेल्या ग्रामपंचायतीने याबाबत तक्रारी करून देखील महसूल विभागाकडून या खदानींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

वसई तालुक्यासह पालघर जिल्हयात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात दगड, मुरूम, मातीची मागणी आहे. मात्र सरकारी प्रकल्पांच्या नावाखाली शासकीय नियम आणि अटी धाब्यावर बसवून अनधिकृतपने दगड खाणी, क्रशर मशीन सुरू आहेत. यामध्ये आदिवासींच्या अज्ञानाचा आणि अडचणींचा फायदा घेतला जात असून आदिवासींना दिलेल्या वनपट्ट्यांसह, इतर जमिनीवर राजरोसपणे उत्खनन सुरू आहे. मात्र, महसूल विभागाकडून याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकर्‍यांकडून केला जात आहे.
दगडखाणीत सुरुंगाचे स्फोट घडवले जात असल्याने गावातील अनेक घरांच्या भितींना तडे गेले आहेत. त्यामुळे अनेक घरे धोकादायक स्थितीत गेली असून भविष्यात दुर्घटना होऊन जिवीतहानी होण्याच्या भितीने गावकरी हवालदिल झाले आहे. त्याचबरोबर गावातील रस्त्यावरून दगड, माती, मुरुमची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रस्त्याची पार दुर्दशा झाली आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जेणेकरुन दुर्गम भागाचा विकास होईल, मात्र विकासापेक्षा नवा जिल्हा शासकीय अधिकारी, दलाल आणि कंत्रादारांसाठी भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे. अनधिकृत खाण मालक आणि महसूल विभागाचे अधिकारी यांच्या संगनमतामुळे आडणे गावातील सामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर तातडीने कारवाई केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने महसूल विभाग आणि दगड खाणींच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -