डहाणू : डहाणू, दापचरी आणि धुंदलवाडी परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सौम्य तीव्रतेच्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या भागातील ग्रामीण लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. 2018 पासून पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू आहे. डहाणू परिसर धुंदलवाडी विशेषतः भूकंपग्रस्त भाग ठरत आहेत. या परिसरात वारंवार तीव्र स्वरूपाचे हादरे बसत असल्याने अनेक घरांना तडे गेल्याचे समोर आले आहे. डहाणू तालुक्याच्या जवळच्या भागात हादरे जाणवतात. त्यामुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. अनेक कुटुंबे आपल्या घरांपासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत. स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Earthquake: डहाणू पुन्हा हादरले: सौम्य तीव्रता असलेल्या भूकंपाचा धक्का
written By My Mahanagar Team
अनेक कुटुंबे आपल्या घरांपासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा विचार करत आहेत. स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -