घरपालघरआंबा, काजु कलमाच्या मदतीने आर्थिक उन्नती !

आंबा, काजु कलमाच्या मदतीने आर्थिक उन्नती !

Subscribe

या संस्थेने अनेक गावांतील मोजक्या शेतकर्‍यांची निवड करून त्यांना आंबा व काजू या रोपांची कलमे देण्याचे काम केले.

जव्हार: तालुक्यातील भात कापणीची कामे उरकली की पोटाची खळगी भरण्यास रोजगार मिळविण्यासाठी, कामाच्या शोधात नजीकच्या शहरात स्थलांतरित होऊन आदिवासी बांधवांची भटकंती सुरू होते. पण या गोष्टीला अपवाद आहे, जव्हार तालुक्यातील वनवासी हे गाव. ज्या वनवासी गावात एकेकाळी पाणी ,रस्ते आणि दळणवळणाची समस्या होती,अशा परिस्थितीत या गावाला बायफ संस्थेच्या मदतीमुळे या गावात कलम बनविणारे गाव’ असे ओळखले जाऊ लागले आहे. तेेेव्हापासून या गावाचा कायापालट होऊन शेती क्रांती घडून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला आहे.
1993 साली जव्हार तालुक्यात बायफ संस्था सुरू झाली. या संस्थेने अनेक गावांतील मोजक्या शेतकर्‍यांची निवड करून त्यांना आंबा व काजू या रोपांची कलमे देण्याचे काम केले.

साधारणपणे 1997 साली बायफ या संस्थेकडून जव्हार तालुक्यातील वनवासी या गावाची निवड करण्यात आली. तेव्हा या गावातील काशिनाथ गावित व मोहन किरकिरा या दोन शेतकर्‍यांना आंब्याची 20, काजूची 30 तर पेरूची 10 अशी कलमे दिली. या कलमांचे संवर्धन करण्यासाठी संस्थेने वर्षांला 800 रुपयेही दिले. त्यानंतर 1998 साली संस्थेकडून याच शेतकर्‍यांना 128 बंगलोरी मोगर्‍याची रोपे ही फुलशेती हा जोडधंदा करण्यात येऊन आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून देण्यात आली. मोगरा लागवड करून त्यातून मोगर्‍याची शेती फुलवली व सात महिन्यांत या शेतकर्‍यांना यातून दिवसाला एक किलोपर्यंत मोगर्‍याचे उत्पादन मिळायला सुरुवात झाली. या फुलांची विक्री तालुक्याच्या ठिकाणी करून त्यांना प्रति किलो 40 ते 50 रुपये एवढा बाजार भाव मिळाला.यातून आर्थिक भरभराटीला काही अंशी सुरुवात झाली. वर्षांपोटी या गावात जवळपास आंब्याची एक लाख ते पाच लाख कलमे तयार करून त्यांची विक्री केली जाते. या कलमाची किंमत प्रति कलम 70 ते 80 ,तर दोन वर्ष असल्यास 140 ते 150 रुपये मिळतात.या ठिकाणी केशर,राजापुरी,सुवर्ण रेखा,हापूस इत्यादी जातीचे आंबा कलमे तयार केली जातात. तसेच मोगर्‍याची बंगलोर जातीची कलमे तयार करून कलमांची विक्री केली जाते. या कलमाची किंमत प्रति कलम 9 रूपये एवढी मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -