पालघर जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी!

हिंदू सणातील महत्वाचा मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेसोबत मंगळवारी ईददेखील साजरी करण्यात आली.

हिंदू सणातील महत्वाचा मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेसोबत मंगळवारी ईददेखील साजरी करण्यात आली. पाघर जिल्ह्यातील बहुतांश शहरी तसेच ग्रामीण भाग मुस्लिम बहुल असल्याने विविध ठिकाणी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्यानंतर एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. गुलाबाचे फुल भेट दिल्या.

मोखाड्यात गुलाबपुष्प देत शांततेत ईद साजरी करण्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी व पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी मोखाडा वासीयांना आवाहन केले. सण-उत्सव त्योहार हे आपसी सलोखा वाढविण्याचे उत्तम माध्यम असून या माध्यमातून मने एकत्र येतात. आपापसातील हेवेदावे, द्वेष मिटवून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून माणसे एकमेकांना भेटत असतात. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे जर कोणी वर्तन केले तर गय केली जाणार नाही. हद्दीत जर कुणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करा, असे आवाहन केले. यावेळी गुलाबपुष्प देत डीवायएसपी प्रशांत परदेशी व पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी मुस्लीम समाजाच्या लोकांना शुभेच्छा दिल्या.

वाडा तालुक्यात मुस्लिम बहुल गावे असलेल्या वाडा, कुडूस, खानिवली, नारे वडवली या गावात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज त्या-त्या गावच्या मशिदीत नमाज पठण केले. त्यानंतर परस्परांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी दफनभूमीत जाऊन आप्त व स्वजनांच्या थडग्यांवर फुले वाहून आदरांजली वाहिली. वाडा पोलिसांनी कुडूस येथे मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना पूर्ण होऊन चंद्र दर्शन झाल्याने मंगळवारी मनोर परिसरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी करण्यात आली. मुस्लिम कालगणनेनुसार नववा महिना असलेल्या रमजानच्या अखेरीस चंद्र दर्शनानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी ईद-उल- फित्र साजरी केली जाते. मनोर, टेन, टाकवाहाल, काटाले, सोनावे आणि दहिसरतर्फे मनोर गावातील मुस्लिम वस्तीत मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. सकाळी सामुहिक नमाज पठण केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत मुस्लिम बांधवानी एकमेकांना ईद मुबारक म्हणत ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त प्रत्येकाच्या घरी शीर खुरमा तयार करण्यात आला होता.

ईदनिमित्त घरी येणाऱ्या प्रत्येकाला शीर खुरमा, मिठाई दिली जात होती. लहानगे पारंपरिक वेष परिधान करून थोरामोठ्यांकडे ईदी मागण्याचा हट्ट करताना दिसले. गुलाब पुष्प देत पोलिसांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस मनोर मशिदीसमोर उपविभागीय पोलीस अधिकारी के. एस. हेगाजे, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, गजानन पडळकर, पोलीस उत्तम बिरारी, सागर सरीकर आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर वसईतही दोन वर्षानंतर मुस्लिम बांधव मोकळेपणाने ईद साजरी केली. वसईच्या दिन दयाल मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी ईदची पहिली नमाज पठण केली. मुस्लिम धर्मीयांचे रमजान सणाचे पूर्ण महिन्याचे कडक रोजा ठेवून मंगळवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाची ईदची नमाज तब्बल दोन वर्षांनी जव्हार ईदगाह मैदान येथे अदा केली. जव्हार शहर व खेडोपाड्यातील मुस्लिम बांधव यांनी नमाज पठण केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी हे स्वतः पहाटेच्या नमाज पठणापासून मस्जिद ईदगाह परिसरात उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर ईदगाह येथे नमाज नंतर पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप तेंडुलकर, माजी सभापती गणेश राजपूत आदींनी मुस्लिम बांधवांना गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा –

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार