घरपालघरदोन वर्षानंतर पालघर जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या निवडणुका

दोन वर्षानंतर पालघर जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या निवडणुका

Subscribe

पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार सहकारी बँकांच्या निवडणुका कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या होत्या.

पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या चार सहकारी बँकांच्या निवडणुका कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या होत्या. त्या बँकांच्या निवडणुकीला आता मुहूर्त मिळाला असून येत्या जून आणि जुलै महिन्यात निवडणुका होणार असून आता मतदार याद्या अद्यायावत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. वसई विकास सहकारी बँक, वसई जनता सहकारी बँक, बॅसिन कॅथॉलिक बँक आणि जव्हार अर्बन बँकेचा समावेश आहे. वसई तालुक्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्याचप्रमाणे येथे सहकाराचे जाळे ही मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. तालुक्यात सहकार क्षेत्रात बॅसिन कॅथलिक बँक, वसई विकास बँक, वसई जनता बँक तीन मोठ्या बँका कार्यरत आहेत.

 

- Advertisement -

वसई विकास बँकेची मुदत २७ जुलै २०२० ला संपली होती. वसई जनता बँकेची मुदत २४ मे २०२० ला संपली होती. तर बॅसिन कॅथॉलिक बँकेची मुदत २१ जून २०२० ला संपली होती. कोरोनामुळे तिन्ही बँकांच्या निवडणुका सतत पुढे जात होत्या. त्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून जून आणि जुलै महिन्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने लागणाऱ्या मतदार याद्यांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या ख्रिश्चन समाजाची बँक म्हणून ओळख असलेल्या बॅसिन कॅथॉलिक बँकेची उलाढाल १२ हजार कोटीच्यावर आहे. वाडवळ समाजाची बँक म्हणून ओळख असलेल्या वसई विकास बँकेची उलाढाल सत्तावीसशे कोटींची आहे. तर वसई जनता बँकेची उलाढाल अकराशे कोटींच्या वर आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या या बँकांच्या रखडलेल्या निवडणुकांमुळे ऐन पावसाळ्यात बँकांचे राजकारण चांगलेच रंगणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईतील नाले सफाईच्या कामाची होणार पोलखोल, साॅफ्टवेअर ठेवणार कामांवर लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -