घरपालघरठरलं ! पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

ठरलं ! पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Subscribe

यामध्ये पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.उमेदवारी अर्ज भरण्यास २१ सप्टेंबर पासून सुरवात होणार असून २७ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

वाणगाव : राज्यातील बहुप्रतिक्षीत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामध्ये जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा समावेश असून थेट सरपंच पदाच्या निवडीसह या निवडणुका पार पडणार आहेत.
११६६ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान पार पडणार असून दुसर्‍या दिवशी १४ ऑक्टोबरला निकाल घोषीत होणार आहेत.यामध्ये पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.उमेदवारी अर्ज भरण्यास २१ सप्टेंबर पासून सुरवात होणार असून २७ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.तर लगेचच २८ सप्टेंबर रोजी सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार असून २९ सप्टेंबरपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. ठाकरे आणि शिंदे गटातील फुटीनंतर राज्यात प्रथमच मोठी निवडणूक पार पडणार असून यामुळे ग्रामीण भागात नेमके कुणाचे बळ जास्त आहे ते समोर येणार आहे.त्यामुळे सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुका पुढीलप्रमाणे आहेत. डहाणू – ६२, विक्रमगड – ३६, जव्हार – ४७, वसई – ११, मोखाडा – २२, पालघर – ८३, तलासरी – ११, वाडा – ७० अशा एकूण ३४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -