घरपालघरवाड्यातील ७० ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणुका जाहीर

वाड्यातील ७० ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणुका जाहीर

Subscribe

२५ , २७ व २८ ऑक्टोबर अशा तीन दिवस व तीन टप्प्यात होणार आहेत. या निवडणुका निवडून आलेल्या सदस्यांमधून बहुमताने होणार आहेत.

वाडा : तालुक्यात ७० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदासाठी १६ ऑक्टोबर रोजी निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत प्रथमच सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली आहे. आता उपसरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून २५ , २७ व २८ ऑक्टोबर अशा तीन दिवस व तीन टप्प्यात होणार आहेत. या निवडणुका निवडून आलेल्या सदस्यांमधून बहुमताने होणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील गुंज, बुधावली व देवघर अशा ३ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवडणुका होणार आहेत. २७ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील कांबारे, वरले,बालीवली, कोंढले,हरोसाळे, मोज,गुहीर – कुले, कलमखांड, पालसई, वडवली, आखाडा, ओगदा, गांधरे, बिलोशी,देवली, मांडवा, सुपोंडे, गोर्‍हे, जामघर, केळठण, सोनाळे, अबिटघर, मुसारणे, डोंगस्ते अशा २४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी निवडणुका होणार आहेत. २८ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील खरै-अंबिवली, कुयलू , सापणे- बु , पोशेरी,कासघर, शेले, सापरोंडे,उसर, सोनशिव, डाहे, सारशी, तुशे, सांगे, गाळतरे, खरीवली-कोहज, मांडा,खानिवली, अंबिस्ते -बु ,घोणसई, नारे, वरसाळे, उज्जनी, चिखले, गातेस- बु , कुडूस, वसुरी- बु , बिलावली, मानीवली, पीक, गारगांव,मांगरुळ, कंचाड, ब्राह्मणगाव, अंभई, पिंपळास, आब्जे,नांदनी, डाकिवली, बिलघर, कळंभे, तिळगाव, कोने, कोनसई अशा ४३ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील स्थानिक आघाडींच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच माणूस निवडून येईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -