घरपालघरकर्तव्य पार पाडताना कर्मचार्‍यांनी आरोग्याची काळजी घ्या

कर्तव्य पार पाडताना कर्मचार्‍यांनी आरोग्याची काळजी घ्या

Subscribe

तसेच समाजातील बाल विवाह, कुपोषण, आरोग्याच्या समस्या यांबाबत गाव पाड्यातील नागरिकांत असलेला मागासलेपणा दूर करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन लवकरच करणार असल्याचे यावेळी बोलताना गिते यांनी सांगितले.

मोखाडा:  पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह इतरही शासकीय कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी यांचे रोजची शासकीय कामे करताना शुगर, बीपी यांसारख्या आजाराकडे दुर्लक्ष होते.यामुळे कर्मचार्‍यांमध्ये याबाबत जागृती होण्यासाठी मोखाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी जनसंवाद अभियानाअंतर्गत शासकीय कर्मचार्‍यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना गिते यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आवाहन करताना प्रत्येक कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य पार पाडताना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच बीपी, शुगर यांसारख्या आजारांची वेळीच तपासणी करावी. तसेच समाजातील बाल विवाह, कुपोषण, आरोग्याच्या समस्या यांबाबत गाव पाड्यातील नागरिकांत असलेला मागासलेपणा दूर करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन लवकरच करणार असल्याचे यावेळी बोलताना गिते यांनी सांगितले.

तर गटविकास अधिकारी जाधव यांनी पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक करीत सर्व सामान्य नागरिकांच्या मनात असलेली पोलिसांबद्दलची भिती अशा समाज उपयोगी कार्यक्रमातून दूर होण्यास मदत होईल,असे सांगितले. या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर, डॉ.किशोर देसले, पोलीसउपनिरीक्षक संजय भुसाळ,अशोक पाटील, जमशिद शेख, भरत गारे, प्रकाश धोडी, शिक्षक नितीन आहेर तसेच इतर विभागातील कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -