Eco friendly bappa Competition
घर पालघर पालघरच्या रस्त्यावर बॅनरचे अतिक्रमण

पालघरच्या रस्त्यावर बॅनरचे अतिक्रमण

Subscribe

त्यासाठी पालघर नगरपरिषद अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे उजेडात आले आहे.

पालघरः पालघर- माहीम बाह्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्याकडेला जाहिरात बॅनर लावण्यासाठी बिल्डरांची चढाओढ लागलेली असून रस्त्याच्या अगदी बाजूला लोखंडी होर्डिंग उभे करून रोड मार्जिंगवर अतिक्रमण करण्यात येत आहे. त्यासाठी पालघर नगरपरिषद अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे उजेडात आले आहे.

जाहिरात फलक लावण्यासाठी पालघर नगरपरिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते. पण, तशी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच होर्डिंग लावण्याचे काम सुरु असल्याची तक्रार शिवसेना युवा अध्यक्ष नैवेद्य संखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. बेकायदा अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

०००

अनधिकृत लोखंडी होर्डिंग तात्काळ काढण्यात येतील. तसेच असे फलक लावणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.

- Advertisement -

—आशिष संखे,शाखा अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,पालघर

०००

बॅनर होर्डिंग रोड मार्जिनमध्ये असेल तर तो मी स्वतः तो होर्डिंग आतमध्ये घेण्यात येईल.

—करीम कलाडिया, बिल्डर, पालघर

- Advertisment -