घरपालघरहायवेवरील वनजमिनींवर अतिक्रमण

हायवेवरील वनजमिनींवर अतिक्रमण

Subscribe

भूमाफियांकडून महामार्गालगतचे वनविभागाच्या मालकीचे मोक्याचे भूखंड हडप केले जात असताना वनविभागाकडून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वसई : मुंबई- अहमदाबाद हायवेलगत असलेल्या कुडे आणि बोट गावच्या हद्दीतील वन जमिनींवर अतिक्रमण करून बेकायदा ढाबे आणि हॉटेल्स उभी करण्यात येत आहेत. मात्र, वनविभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कुडे आणि बोट गावच्या हद्दीत वनहक्क दाव्यातून आदिवासींना कसण्यासाठी मिळालेल्या महामार्गालगतच्या मोक्याच्या जागांवर वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या नाकावर टिच्चून हॉटेल्स आणि ढाब्याची बांधकामे सुरू आहेत. वनजमिनींवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या हॉटेलच्या बांधकामांच्या तक्रारीनंतरही कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. भूमाफियांकडून महामार्गालगतचे वनविभागाच्या मालकीचे मोक्याचे भूखंड हडप केले जात असताना वनविभागाकडून अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भूमिहीन असलेल्या आदिवासींना शेती करून उदरनिर्वाह करण्यासाठी २००५ साली पारित करण्यात आलेल्या वन हक्क अधिनियमा अंतर्गत आदिवासींना वनपट्टा उपलब्ध करून दिला जातो. निवार्‍यासाठी घरा व्यतिरिक्त बांधकाम आणि विक्रीस मनाई आदी अटीशर्तीसह वनहक्क दाव्या अंतर्गत आदिवासींना जमीन उपलब्ध करून देण्यात येते. वनहक्क दाव्यातून मिळालेल्या जागेची विक्री केल्यास वनपट्टा रद्द करून जमीन शासन जमा करण्याचा अधिकार शासनाला आहे. परंतु आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या वन पट्ट्यामध्ये अनधिकृतपणे व्यावसायिक बांधकामे सुरू आहेत. दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीतील कुडे बोट राउंड अंतर्गत महामार्गालगत मुंबई मर्गिकेवरील बोट गावच्या हद्दीतील उड्डाणपूलालगत दोन तर गुजरात मार्गिकेवर वृद्धाश्रमालगत ढाबे बांधकाम आणि माती भराव केला जात आहे. आदिवासी खातेदाराला वनहक्क दाव्या अंतर्गत मिळालेल्या जमिनीवर सपाटीकरण करून हॉटेलचे बांधकाम सुरु आहे. हॉटेल बांधकामाबाबत वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचा पंचनामा करून बांधकाम थांबवले होते. काही दिवस बंद असलेले हॉटेलचे बांधकाम पुन्हा सुरू करून ढाबा हॉटेलचे बांधकाम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -