Eco friendly bappa Competition
घर पालघर उद्योजकता प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करणार

उद्योजकता प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करणार

Subscribe

महारोजगार मेळाव्याचे आयोजन भाजप आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

बोईसर : आदिवासी उमेदवारांकरिता जव्हार येथे प्रस्तावित असलेले नवीन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरु करण्यात येईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केले.यासाठी आवश्यक सर्व बाबींची उपलब्धता करुन देऊन लवकरच हे केंद्र सुरु करण्यात येईल तसेच आज जिल्ह्यात ५ ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या स्किल सेंटर्सचा जिल्ह्यातील युवक-युवतींना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघरमधील स्कील सेंटरच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. याशिवाय तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भाजपच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. महारोजगार मेळाव्याचे आयोजन भाजप आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

गुरुवारी तारापूर औद्योगिक वसाहती मधील टिमा सभागृहात आयोजित मेळाव्याला १ हजार २०० पेक्षा अधिक उमेदवारांची नोंदणी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.रोजगार मेळाव्यात तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, एलआयसी आणि खासगी बँकांचे मिळून ६५ पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले होते.यावेळी उद्योग भारतीच्या तारापूर युनिटची स्थापना कौशल्य विकास आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आली. भाजपच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात स्थानिक पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली.जिल्हा संघटन सचिव संतोष जनाठे यांच्या पुढाकाराने आयोजित महारोजगार मेळाव्याला खासदार राजेंद्र गावित, टीमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी, उद्योग भारतीचे अध्यक्ष भुषण मर्दे, रवी भावसार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -