घरपालघरअत्यावश्यक सुविधांचा खेळखंडोबा झाला, गुजरातच्या जीवावर डहाणू विसंबलेला

अत्यावश्यक सुविधांचा खेळखंडोबा झाला, गुजरातच्या जीवावर डहाणू विसंबलेला

Subscribe

डहाणू तालुक्याप्रमाणे तलासरी तालुक्याची देखील हीच अवस्था असून नेहमीच इथल्या रुग्णांना उपचारांसाठी गुजरात मधील वलसाड, सुरत आणि केंद्रशासित प्रदेश सेलवास येथील रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

डहाणू,: तत्काळ वैद्यकीय सुविधा ही एकाद्या रूग्णाची महत्वाची गरज असते.त्यात आवश्यक ती सुविधा न मिळाल्याने रूग्णाचे नुकसान देखील होऊ शकते.परंतु,लोकसंख्येच्या दृष्टीने वाढत जाणार्‍या डहाणू तालुक्यात अजूनही अत्यावश्यक आणि गरजेच्या सुविधांमध्ये मोडणार्‍या वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. डहाणू तालुक्याप्रमाणे तलासरी तालुक्याची देखील हीच अवस्था असून नेहमीच इथल्या रुग्णांना उपचारांसाठी गुजरात मधील वलसाड, सुरत आणि केंद्रशासित प्रदेश सेलवास येथील रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

याचेच ताजे उदाहरण म्हणजेच डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात वाढवण येथील रहिवासी असलेली सोनाली पराग अंभिरे ह्या महिलेला 25 ऑक्टोबर रोजी प्रसूतीसाठी डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी 27 ऑक्टोबर रोजी महिलेची प्रसुती झाली. मात्र, शिशूची प्रकृती बरी नसून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे नवजात शिशू वर त्वरित उपचार करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार डहाणू परिसरात आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न केला. मात्र, आवश्यक सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी गुजरातमधील वलसाड येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यासाठी लागणारी आवश्यक सुविधा उपलब्ध असलेली रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे अंभीरे कुटुंबीयांना नगर परिषदची खाजगी रुग्णवाहिका करून बाळाला रुग्णालयात न्यावे लागले आहे. वलसाड येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, लवकरच बाळाला व आईला घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली आहे. सुदैवाने वेळेवर रुग्णालय गाठल्यामुळे शिशुची प्रकृती स्थिरावली आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे अनेक घटनांमधून समोर येऊन सुध्दा प्रशासन ह्याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे, आता लोकप्रतिनिधींनी तरी आपल्या पुढाकाराने अद्ययावत रुग्णालय होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

जिल्हा सुविधांपासून वंचित

2014 साली पालघर स्वतंत्र जिल्हा स्थापन होऊन सुध्दा आजतागायत पालघर मधील आदिवासी बांधवांना अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मध्यंतरी मोखाडा, वाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यातील काही घटनांमुळे पावसाळी अधिवेशन देखील गाजले होते. मात्र, काही काळ ह्या चर्चांना उधाण येऊन पुन्हा आहे तीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. आर्थिक बाजूने कमकुवत असलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक रुग्णांना उपचारांसाठी गुजरात मधील शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. गुजरात राज्यात उपचार घेताना गरीब आदिवासी रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, तिथल्या कर्मचार्‍यांकडून रुग्णांना त्रासदायक वागणूक मिळत असल्याची देखील अनेक उदाहरणे आहेत. जवळपास वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. परंतु त्या अद्ययावत नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून, त्यांना उपचारासाठी परराज्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तर अनेकवेळा उपचाराअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. ह्यासाठी आपल्या भागात एक अद्ययावत रुग्णालय व्हावे अशी मागणी नागरिकांकडून वेळोवेळी केली जात आहे.

- Advertisement -

प्रसुतीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला उपचारासाठी वलसाड येथे आणल्यावर त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, डहाणू वरून तत्काळ गुजरात मध्ये नेताना मोठ्या अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला आहे. डहाणूसारख्या प्रगत तालुक्यात अद्ययावत वैद्यकीय नसल्यामुळे आम्हाला ह्या अडचणींचा सामना करावा लागला आहेत. नुकत्याच प्रसूती झालेल्या पत्नीला वलसाड नेईपर्यंत जीव भांड्यात पडला होता.
– पराग अंभीरे, सोनालीने पती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -