Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर पालघर देशाच्या अमृत महोत्सवानंतरही पाण्यासाठी पायपीट कायम

देशाच्या अमृत महोत्सवानंतरही पाण्यासाठी पायपीट कायम

Subscribe

या समस्येवर मात करण्यासाठी एवढ्या वर्षात कायमस्वरूपी उपाय योजना आखणे गरजेचे असताना ही समस्या सोडवण्याच्या हेतूने कोणीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत नसल्याचा आरोप ही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पालघर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, वाडा व विक्रमगड तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी 21 टँकरने या तालुक्यांना पाणीपुरवठा होत होता. मात्र पाणीटंचाईचे दुर्भिष्य वाढल्याने दररोज 34 टँकरची सेवा मे महिन्यात सुरू करण्यात आली असून दररोज 108 फेर्‍या टँकरला माराव्या लागत आहेत. पावसाचे आगमन लांबल्यास या फेर्‍यांमध्ये वाढ करावी लागेल अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. मोखाडा, जव्हार, वाडा व विक्रमगड या तालुक्यांमध्ये दरवर्षी गाव पाड्यांमध्ये पाणीटंचाईची झळ बसत आहे.

प्रशासनाकडून दरवर्षी विंधन विहिरी (बोअरवेल) खणल्या जातात. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च शासनाकडून करण्यात येतो. विंधन विहिरी खोदण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही जर पाण्याची टंचाई गाव पाड्यामध्ये जाणवत असेल तर यासाठी होणारे लाखो रुपये हे वाया जात आहेत. विंधन विहीर खोदताना त्यातील पाण्याचा तज्ञ यांना विचारात घेऊन जर विंधन विहिरी खोदल्या तर निश्चितच चांगला परिणाम मिळू शकतो. मात्र कुठेही या विंधन विहिरी खोदत असल्याने पाणी लागेल याची शाश्वती कोणी देऊ शकत नसल्याने बर्‍याचशा विंधन विहिरींना होणारा खर्च वाया जात आहे. या समस्येवर मात करण्यासाठी एवढ्या वर्षात कायमस्वरूपी उपाय योजना आखणे गरजेचे असताना ही समस्या सोडवण्याच्या हेतूने कोणीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत नसल्याचा आरोप ही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात मोखाडा जव्हार वाडा विक्रमगड या चार तालुक्यात 21 गावे 72 पाडे व 37 हजार 920 लोकसंख्या आणि 12877 पशुधन मिळवून 50 हजार 779 लोकसंख्येला 34 टँकरद्वारे 108 हून अधिक फेर्‍या प्रतिदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मोखाडा तालुक्यातील आसे, नशेरा, चास, स्वामी नगर, पाथर्डी, निळमाती, किनसते, शास्त्रीनगर, शाळा धामणी, स्वामीनगर, सातोरली, दापटी एक व दोन हेदेवाडी, गौचारी पाडा, ढवळपाडा, कुणाचा पाडा, हट्टीपाडा, हिम्बटपाडा, मडक्याचे मेट, वारघडपाडा, डोईफोडा, व गामोडी आधी 19 गावे व 52 पाड्यांमध्ये 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मोखाडा तालुक्यात लहान-मोठे 93 गावे आहेत. येथील लोकसंख्या 50 हजार हून अधिक आहे.

 

- Advertisement -

लोकांसाठी नद्या विहिरी झरे आणि तलाव हेच पाण्याचे खरे स्त्रोत असून महिलांना व बालकांना विशेषतः शाळेत जाणार्‍या मुलींना पाणी भरण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटरचा प्रवास करत पायपीट करावे लागत असते. जिल्ह्यातील गावा गावांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना या कंत्राटदार व पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांच्या संगनमताने भ्रष्टाचाराच्या होत असून त्यामुळेच या योजना आल्या त्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकला नाहीत,अशे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -