घरपालघरमालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ

मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ

Subscribe

मिरा भाईंदर शहरातील करदात्यांना  प्रलंबित मालमत्ता कराचा भरणा करणेकामी महापालिकेमार्फत लागू करण्यात आलेली अभय योजना २०२१ या योजनेची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे

मिरा भाईंदर शहरातील करदात्यांना  प्रलंबित मालमत्ता कराचा भरणा करणेकामी महापालिकेमार्फत लागू करण्यात आलेली अभय योजना २०२१ या योजनेची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.’ अभय योजना २०२१ ‘ योजने अंतर्गत मालमत्ता कर भरणाऱ्या आस्थापनांसाठी करावरील व्याजावर ७५ टक्के माफी घ्या आणि कर आणि २५ टक्के दंड असे मिळून भरा आणि कर भरण्यापासून सुटका मिळवावी असे प्रशासनाच्यावतीने जनतेला आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच या योजनेला आता ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मूळ रक्कम भरा आणि  व्याज दंडात ७५ टक्के सूट देण्यासाठी महापालिकेच्यावतीने २५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२१ या २० दिवसांच्या कालावधीमध्ये ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवली गेली होती. यामध्ये थकित मालमत्ता कर धारकांनी आपल्या मालमत्ता कराची २५ टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांची ७५ टक्के दंडात्मक रक्कम माफ केली जाणार आहे. मीरा भाईंदर परिसरात या योजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तास प्राप्त अधिकारान्वये ही योजना लागू करण्यात आलेली होती. ‘मालमत्ता कर अभय योजने’चा कालावधी २० दिवसांचा होता. त्यात आता पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ देत ह्या योजनेंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकित कर असणाऱ्या, तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर ३१ मार्च २०२१ पर्यंत भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

- Advertisement -

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असल्याने थकित मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणीदेखील करदात्यांनी केली होती. त्यानंतर महापालिकेने ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यात जे नागरिक व मालमत्ता धारक “अभय योजना” कालावधीत मालमत्ता कराचा भरणा करणार नाहीत अशा थकबाकीदार मालमत्ता करधारका विरुद्ध महापालिकेमार्फत मालमत्ता जप्त करणे, मालमत्तेचा लिलाव करणे व इतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. दिलीप ढोले यांनी दिली. मालमत्ता कराचा भरणा मोबाईलद्वारे करण्यासाठी महापालिकेने  “MY MBMC” या अँपची निर्मिती करण्यात आली असून ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून द्याद्वारे कराचा भरणा करावा करावा असे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -