फेक ईडीची नोटीस देऊन बिल्डरकडून मागितली खंडणी

त्याच वेळेस रियल इस्टेट एजंट गौतम अग्रवाल २०२१ साली माझा जुना ६ कोटी ५० लाख रुपयांचा हिशोब बाकी असल्या प्रकरणी मागणी करू लागला होता.

भाईंदर :- मीरा- भाईंदरमध्ये शत्रू मालमत्ता जमीन खरेदी केल्याप्रकरणी विकासकांना बोगस ईडीची नोटीस देऊन 6 कोटी ५५ लाख रुपये मागितल्या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१३ साली काशिगाव येथील सर्व्हे नं. ५ हिस्सा क्रमांक ९ व १० व सर्व्हे क्रं. ६ हिस्सा क्रं. ७ व सर्व्हे नं. १०६ ही शत्रू मालमत्ता नूर पटेल कुटुंबियाकडून विकास करण्याकरिता नोंदणीकृत डेव्हलपमेंट करारनामा करून सदरच्या मालमत्तेचा विकासक आनंद अग्रवाल, हरीश (मोंटू ) अग्रवाल व जॉर्डन परेरा यांनी त्या जागेचा ताबा घेतला होता. त्याठिकाणी बांधकाम परवानगी प्राप्त करत त्या जमिनीवर ज्योताचा दाखला घेऊन बांधकाम सुरू केले होते.

त्याच वेळेस रियल इस्टेट एजंट गौतम अग्रवाल २०२१ साली माझा जुना ६ कोटी ५० लाख रुपयांचा हिशोब बाकी असल्या प्रकरणी मागणी करू लागला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात काशीगाव येथे सोशल मीडियावर मीरा- भाईंदरच्या तीन विकासकांच्या नावाने दिल्ली येथून ईडीची नोटीस निघाली असून त्यांची चौकशी होणार अशा आयशाचा मेसेज फिरत होता. त्यानंतर ईडीची नोटीस घेऊन मितेश शहा याने एजंट गौतम अग्रवाल याचे सोल सेलिंगचे पैसे व दिल्लीचा ईडी मॅटर सेटलमेंट करण्यासाठी खंडणी मागितली होती. सदर नोटिशीबाबत ईडी कार्यालयाला मेल करून माहिती मागवली असता ती नोटीस बोगस व फेक असल्याचे समोर आले. त्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला होता. तो काशीगाव येथील जमिनीच्या संदर्भात असल्याने तो काशिमिरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आनंद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम हे करत आहेत.