घरपालघरडहाणूमधील कोविड रुग्णालयातील व्हेंटीलेटरमध्ये बिघाड; आठ रुग्णांचे स्थलांतर

डहाणूमधील कोविड रुग्णालयातील व्हेंटीलेटरमध्ये बिघाड; आठ रुग्णांचे स्थलांतर

Subscribe

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डातील व्हेंटीलेटरच्या कॉम्प्रेसरमध्ये बुधवारी अचानक बिघाड झाला होता. त्यामुळे एकच घबराट पसरली होती.

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डातील व्हेंटीलेटरच्या कॉम्प्रेसरमध्ये बुधवारी अचानक बिघाड झाला होता. त्यामुळे एकच घबराट पसरली होती. व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन आठ रुग्णांना लगेचच विक्रमगड येथील रिव्हेरा रुग्णालयात हलवण्यात आले होते. डहाणू तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमधील आठ व्हेंटीलेटरच्या १० कॉम्प्रेसरमध्ये बुधवारी अचानक बिघाड झाला होता. रुग्णालयात त्यावेळी १० व्हेंटीलेटवर रुग्णांवर उपचार सुरु होते. बिघाड झाल्यावर रुग्णांच्या प्रकृतीला कोणताही धोका पोचू नये म्हणून त्यांना विक्रमगड येथील रिव्हेरा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी सर्व रुग्णांची प्रकृत्ती ठिक असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

शॉर्टसक्रीट आणि विजेचा दाब कमी-जास्त झाल्यामुळे व्हेंटीलेटरचे कॉम्प्रेसर उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. आपात्कालीन परिस्थितीची जाणीव ठेवून वेदांता रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मुंबई इलेक्ट्रॉनिक हब वरून इंजिनिअर बोलावून सदर नादुरुस्त कॉम्प्रेसर दुरुस्त करून इतर रुग्णांसाठी तयार ठेवले आहेत. त्यामुळे रग्णालयातील आयसीयू वॉर्ड पूर्ववत झाला आहे.

- Advertisement -

वेदांता रुग्णालयाकडून कोविड बाधित रुग्णांच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कॉम्प्रेसरमधील बिघाड हा अपवाद म्हणता येईल. विजेचा दाब कमी जास्त झाल्यामुळे सदर प्रकार घडला होता. परंतु पुन्हा कॉम्प्रेसर दुरुस्त करून रुग्णांसाठी सज्ज केले गेले आहेत.
– डॉ. मुकुंद खंडेलवाल, वेदांता कोविड केअर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेदांता रुग्णालयामध्ये आत्तापर्यन्त 380 च्या वर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यातून 300 च्या वर रुग्ण बरे झाले. 30 च्या वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूणच रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Maharashtra Corona Update: राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख होतोय कमी पण…- राजेश टोपे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -