घरपालघरऐन खरिपाच्या तोंडावर बैलबाजार बंद; मशागतीची कामे खोळंबली

ऐन खरिपाच्या तोंडावर बैलबाजार बंद; मशागतीची कामे खोळंबली

Subscribe

सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद असल्याने प्रभावीत झाली आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दीड ते दुप्पट वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच तयार झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीतील कामांची लगबग वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद असल्याने प्रभावीत झाली आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दीड ते दुप्पट वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच तयार झाला आहे. पुढील महिन्यात खरीप हंगाम सुरू होत आहे. हंगामापूर्वी मशागतीच्या कामांसाठी बैलांची मोठी गरज असते. यासाठी शेतकरी गुढीपाडव्यानंतर बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करतात.

यंदा गेल्या दीड महिन्यापासून लॉकाडाऊन सुरू असल्याने सर्व प्रकारचे बाजार बंद आहेत. याचा फटका प्रामुख्याने जनावरांच्या बाजाराला अधिक बसला आहे. बैलांची आवश्यगकता असलेले शेतकरी बाजार उपलब्ध नसल्याने वैयक्तिक स्तरावर शोध घेत आहेत. चांगल्या दर्जाचे, नामवंत जातीचे बैल सहजपणे मिळणे कठिण झालेले आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोड्यांचे दर सव्वा ते दीडपट वाढले आहेत. गेल्यावर्षी ४० हजारात मिळणारी जोडी ६० ते ६५ हजार रुपये देऊनही मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात प्रत्येक तालुक्यात एक ते दोन मोठे जनावर बाजार आहेत. आठवड्याला भरणाऱ्या या बाजारांमध्ये वर्षभर विविध जनावरांच्या खऱेदी-विक्रीचे व्यवहार होता. साधारणतः एप्रिल महिन्यापासून पेरणीपर्यंत बैलजोड्यांची विक्री अधिक होत असते. सध्या बाजारच बंद असल्याने, या बाजारांशी निगडीत इतरही व्यवहार ठप्प झालेले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या हंगामात शेतीच्या कामांना परवानगी दिलेली असली तरी अनेक ठिकाणी ट्रॅक्टरला डिझेल मिळण्यात अडचणी आहेत. वेगाने मशागत होण्यासाठी ट्रॅक्टरची मागणी वाढल्याने यंदा मशागतीच्या दरांमध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. छोटे शेतकरी बैलजोड्यांच्या साह्याने शेतीतील कामे करतात. बाजारांअभावी बैलजोड्या मिळत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे.

बाजार बंदचे परिणाम –

  • चांगले बैल मिळणे कठीण
  • बैलजोड्यांचे दर दीड ते दुप्पट वाढले
  • मध्यस्थांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक
  • बैलजोड्या शोधण्यासाठी धावपळ
  • बाजार बंदमुळे बाजार समित्यांचे उत्पन्न बुडाले
  • बैलजोडीचा दर साधारणतः ४० हजारांपासून सुरू
  • जास्तीत जास्त ८० हजार ते १ लाखापर्यंत दर
  • जनावरांच्या बाजारांवर अवलंबून असलेले व्यवसायही ठप्प

एप्रिल- मे मध्ये खरेदी-विक्रीला वेग

खरिपच्या पेरण्या साधारणतः जून, जुलैमध्ये केल्या जातात. त्यापूर्वी मशागतीची कामे पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात बैल जोड्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. यंदा कोरोनामुळे पशुधन बाजार बंद आहेत. बैलांची खरेदी-विक्री बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्या फायदा घेत काही व्यापारी घेत आहेत. गतवर्षी ६० हजारात मिळणारी जोडी यंदा ७० ते ७५ हजार रुपयांत मिळत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

व्यावसायिक अडचणीत

बाजार बंद असल्याने बैल जोड्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. तसेच चांगले व जातीवंत बैल मिळणे कठीण झाले आहे. खरिपाच्या तोंडावर बैलांच्या शोधात शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. तसेच पशुधनाच्या बाजारावर अवलंबून असणारे व्यावसायिक ही अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा –

लहान मुलांसाठी स्वतंत्र ‘कोविड सेंटर’ची उभारणी करा; भाजपची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -