शेतकऱ्यांची व्यावसायिक शेतीकडे वाटचाल

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भात लागवड करणारा शेतकरी हळूहळू मिरची लागवडीकडे वळला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या फक्त उदरनिर्वाह पुरते शेती करत असतात.

शेतकऱ्यांचे रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भात लागवड करणारा शेतकरी हळूहळू मिरची लागवडीकडे वळला आहे. पारंपरिक शेती करणारा शेतकरी आज व्यावसायिक शेतीकडे वळला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या फक्त उदरनिर्वाह पुरते शेती करत असतात. मात्र रब्बी हंगामात पिकाची लागवड करून शेतकरी पारंपरिक शेती करत असतानाच आज व्यावसायिक शेतीकडे वळू लागले आहेत. रब्बी हंगामात सिंचनावर आधारित शेती केली जाते. डिसेंबर अखेरीस छोट्या छोट्या कालव्यांमार्फत शेती सिंचनासाठी पाण्याची सोय केली जाते. खरीप हंगामात पालघर जिल्ह्यात १५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात भात शेतीसाठी लागवड करण्यात येते. पण, रब्बी हंगामात सिंचनाद्वारे शेतीसाठी पाणी पुरवत असल्याने लागवडीखालील क्षेत्र खरीप हंगामातपेक्षा कमी असते. यावर्षीच्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घासला शेतकऱ्याला मुकावे लागले आहे. त्यामुळे आता शेतीत झालेले नुकसान भरून निघावे यासाठी सध्या शेतकऱ्यांनी लक्ष रब्बी हंगामकडे केंद्रित केले आहे.

यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना भातशेतीत मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. आता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी शेतीला सुरुवात केली आहे. घारपुरे कृषी केंद्रांमध्ये रब्बी हंगामातील सर्व हळवी वाण उपलब्ध आहेत.
– शैलेश घारपुरे, घारपुरे कृषी केंद्र

उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच कर्जत १८४, कर्जत ३, सुमा, कर्जत ४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर १ आदी साडेतीन ते चार महिन्यात तयार होणाऱ्या जातीचा वापर करून यांची देखील लागवड केली जाते. खरीप पिकापेक्षा उन्हाळी भात पीक अधिक येण्याची शेतकऱ्यांना आशा असल्याने उन्हाळी भात लागवडीकडे शेतकरी वळतो. त्यासाठी पावसाळी हंगामात जुलै व ऑगस्ट महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश काळ कमी असतो. याउलट उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश भरपूर असतो. त्यामुळे खताला प्रतिसाद जास्त असतो आणि उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळेल. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आद्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही रोगाचे प्रमाण पावसाली भात पिकापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. तसेच पावासाळी भातापेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते. भाताचे उत्पादन पावसाळीपेक्षा उन्हाळी हंगामात चांगले येईल, अशी आशा अनुभवी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

डहाणू ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक शेतीची लागवड करताना व्यावसायिक शेतीकडे वळला आहे. पावसाळ्यात भात लागवड झाल्यानंतर शेतकरीवर्ग गवार, चवळी, मिरची आणि इतर भाजीपाला लागवड करत आहे.
– अनिल ईभाड, शेतकरी (निकने गाव)

म्हणूनच रब्बी हंगामात शेतकरी बागायती शेतीकडे वळू लागला आहे. यात मिरची लागवडीकडे शेतकरी वळला असून भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करत आहे. रब्बी हंगामामध्ये भात लागवडीसाठी रब्बी हंगामामध्ये भात लागवडीसाठी राशि, राशि पूनम गोल्ड, सिंधू, जोरदार, सूरज प्लस ही वाण लागवडीसाठी कृषी केंद्र उपलब्ध आहेत. रब्बी हंगामामध्ये कालव्याद्वारे पाणी दिले जात असल्यामुळे पाण्याच्या पाळ्या ठरलेल्या वेळेत शेतकरी देऊ शकत असल्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादन खरीपपेक्षा वाढलेली दिसत आहे. रब्बी हंगाम तोंडावर आल्यामुळे पाटबंधारे विभागाने १५ ते २० डिसेंबरपर्यंत कळवण पाणी सोडणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

(कुणाल लाडे – हे डहाणूचे वार्ताहर आहेत)

हेही वाचा –

अंबडच्या फरार लाचखोर पीएसआयसह हवालदाराला अटक