घरपालघरभ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेकडून आमरण उपोषण

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेकडून आमरण उपोषण

Subscribe

दुसरीकडे ग्रामपंचायत ना हरकत दाखला ठरावाच्या नोंदी आधारे काही क्रशरमशीन दगड खाणींना तात्पुरता बिनशेतीसाठी ठराव दिल्याची कागदपत्रे दाखवण्यात आली.

पालघर: वाडा तालुक्यातील मांडा ग्रामपंचायत हद्दीतील क्रशर,खदानी, दगडखान व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याने परिसरातील घरे,शेती,जंगल यांचे मोठे नुकसान होत आहे.याचा निषेध करत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने तक्रार दाखल केली होती. मात्र त्याविरोधात कुठलीही कारवाई तहसीलदार करीत नसल्याने सदर संघटनेचे जिल्हाध्यक्ष निखिल राऊत यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वाडा तालुक्यातील एका बिनशेती परवाना देण्याबाबत दिवाणी कनिष्ठ सर न्यायालयात दावा दाखल असताना सुद्धा तात्पुरते बिनशेती परवाने देण्यात आले असून शिवसाई महिला ग्री गेट्स (दगडखाण) भोपिवली गट नंबर 248,249,250 मधील एकूण क्षेत्र जमिनीपैकी ०.६६.० हेक्टर आरमध्ये दगडखान काढणे कामे देण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीने बिनशेती परवाने देण्यात आले आहेत. परवाना घेताना अटी आणि शर्थींमधील वनविभागाची परवानगी घेतलेली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. दुसरीकडे ग्रामपंचायत ना हरकत दाखला ठरावाच्या नोंदी आधारे काही क्रशरमशीन दगड खाणींना तात्पुरता बिनशेतीसाठी ठराव दिल्याची कागदपत्रे दाखवण्यात आली.

मात्र तक्रारदाराने ग्रामपंचायतीमधून अर्ज देऊन माहिती मागवली असता 13 ऑगस्ट 2019 रोजी कोणत्याही प्रकारची ग्रामसभा झालेली नाही. असा दाखला ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तसेच सातबारावर ३५ लाख रुपयांचा बोजा दाखवला जात असताना देखील संबंधित मंडळ अधिकारी यांच्या जबाब मध्ये सदर जमिनीवर कोणत्याही प्रकारचा बोजा नाही, असा जबाब लिहून दिल्याबाबत तक्रारदाराने लिखित तक्रार केली आहे. दुसरीकडे ब्ल्यूबेरी ऍग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर 146, 147 गाव वावेघर या उद्योगाला 30 ऑक्टोबर 2023 रोजी बंद करण्याचे आदेश देण्यात आले असताना सुद्धा त्या कंपनीचे काम सुरू आहे. मॅजिकेट बिल्डिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या देवळी गट क्रमांक २५,२७,२८,५० वर काम सुरू असलेल्या कंपनीची एक वर्षाची मुदत संपूनही ग्रामपंचायत ना हरकत दाखले न घेता अनेक कंपनीची बांधकाम चालू असून काही कामे पूर्णत्वास आलेली आहेत. तरी तालुक्यातील सर्व कंपन्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -