घर पालघर एसटी कर्मचार्‍यांचे आमरण उपोषण

एसटी कर्मचार्‍यांचे आमरण उपोषण

Subscribe

तिथेच पदोन्नती न देता इतर ठिकाणी पदोन्नती देऊन पदोन्नती झालेल्या कर्मचार्‍यांना नाहक त्रास दिला जातो.तसेच करारप्रमाणे प्रशासन वागत नसल्याची तक्रार संघटनेमार्फत करण्यात येत आहे.

पालघर: एसटी महामंडळाच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेमार्फत राज्य कार्यकारणीचे आझाद मैदान येथे ११ सप्टेंबर पासून तर विभागीय स्तरावर १३ सप्टेंबर पासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत संघटनेचे विभागीय सचिव अर्षद चुनेवाला यांनी सांगितले की,गेल्या पाच ते सात वर्षांपासून अनुकंपा तत्वानुसार लिपिक टंकलेखक पदाच्या भरती झालेल्या नाहीत.तसेच महिला कर्मचार्‍यांना होणारा मानसिक त्रास, आणि खात्यामार्फत पदोन्नती देताना कर्मचारी काम करीत असलेल्या ठिकाणी रिक्त जागा असताना, तिथेच पदोन्नती न देता इतर ठिकाणी पदोन्नती देऊन पदोन्नती झालेल्या कर्मचार्‍यांना नाहक त्रास दिला जातो.तसेच करारप्रमाणे प्रशासन वागत नसल्याची तक्रार संघटनेमार्फत करण्यात येत आहे.

आमच्याकडे उपोषणाचे असे कुठलेच पत्र आले नाही आहे.

- Advertisement -

–राजेंद्र जगताप, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ पालघर.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे महागाई भत्ता आम्हाला मिळावा, आमचा तसा प्रशासना बरोबर करार आहे. तो आम्हांला गणपतीपर्यंत मिळावा, म्हणून आम्ही उपोषणाचे पत्र ९ सप्टेंबरलाच दिलेले असून,आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही उपोषणावर ठाम आहोत.
–अर्शद चुनेवाला,विभागीय सचिव,महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.

- Advertisement -

एकीकडे विभाग नियंत्रक आम्हाला उपोषणाचे पत्र मिळालेलेच नाही असे म्हणत आहेत. तर दुसरीकडे ९ सप्टेंबरला पत्र दिल्याची प्रत आम्हाच्याकडे आलेली आहे. त्यात स्पष्ट दिसते की, नितिन मराडे लेखणीक रा.प.पालघर विभाग यांनी ९ सप्टेंबर रोजी ही प्रत आपली सही शिक्का आणि दिनांक टाकून स्वीकारली आहे.

- Advertisment -