घरपालघरदोन जानेवारीपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात

दोन जानेवारीपासून पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात

Subscribe

मीरा-भाईंदर व वसई विरार शहरात पोलीसांची १ हजार पद रिक्त असून पोलीस भरती पारदर्शकपणे पार पाडली जाणार असल्याचे प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे.

भाईंदर : संपूर्ण महाराष्ट्र प्रमाणे मीरा-भाईंदर, वसई आयुक्तालाच्या हद्दीत देखील नवीन वर्षात २ जानेवारी २०२३ पासून पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांच्या पोलीस भरती मैदानी चाचणीला सुरुवात होणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे. मैदानी चाचणीच्या प्रक्रियेला जवळपास १ ते २ महिन्याचा कालावधी लागणार आहे. अर्जदारांची मैदानी परीक्षा झाल्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर व वसई विरार शहरात पोलीसांची १ हजार पद रिक्त असून पोलीस भरती पारदर्शकपणे पार पाडली जाणार असल्याचे प्रकाश गायकवाड यांनी सांगितले आहे.

मीरा- भाईंदर शहरात पोलीस भरतीसाठी १५ डिसेंबर २०२२ पर्यंत देण्यात आलेला कालावधी पूर्ण झाला असून ९९६ रिक्त पदासाठी एकूण 73 हजार २२१ अर्ज आले असून यात मुलांचे ६० हजार ९८९ तर १२ हजार २३२ मुलींचे अर्ज पोलीस शिपाई यापदाकरता आल्याची माहिती मीरा-भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या मार्फत देण्यात आली आहे. याच बरोबर पोलीस वाहन चालक पदाकरता १,१९६ मुलांचे तर ४१ मुलींचे असे एकूण १ हजार २३७ अर्ज आले आहेत. पोलीस भरती करता अर्ज केलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे शहरातील निवड केलेल्या ( सुभाष चंद्र बोस मैदान, जेसल पार्क परिसरातील मैदान ) या दोन मैदानांचा वापर करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -