मनोरमधील काचपडा येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी

मनोर पोलीस ठाणे अंतर्गत घाणेघर येथील काचपडा येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.

मनोर पोलीस ठाणे अंतर्गत घाणेघर येथील काचपडा येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील लोकांना जबर मार लागला आसून त्यांच्यावर मनोर येतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मनोर पोलिसात परसपर विरोधात गुन्हा दाखल असून चार आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी फरार आरोपीचा मनोर पोलीस शोध घेत आहेत. मनोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घाणेघर काचपाडा येथील गट नं. ६२ मध्ये बाबल्या लाडक्या डोले, विलास लाडक्या डोले, रघुनाथ लाडक्या डोले, विश्वनाथ लाडक्या डोले , डोक्या लडक्या डोल्या, रसुला विलास डोले, मिथुन विलास डोले (सर्व रा. घाणेघर, थप्पडपाडा) हे सर्व मिळून बळजबरीने जमिनीत कंपाउंड करत होते.

त्यांना याचा जाब विचारण्यासाठी रवींद्र गोविंद डोले, मधू सुरजी डोले, सदू सुरजी डोले, रविना रवींद्र डोले, गोविंद नन्हू डोले, किसन सुरजी डोले जमिनीवर गेले होते. आमच्या जमिनीत कम्पाउंड का करता, असे त्यांनी विचारल्यानंतर मनात राग धरून त्यांना शिवीगाळ करून हातातील पावडा, सळई, काठ्या व पहारीने मारहाण करत त्यांना गंभीर दुखापत केली. सध्या सर्व जखमी मनोर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मनोर पोलीस ठाण्यात या मारहाणीचा गुन्हा दाखल असून बाबल्या लाडक्या डोले, विलास डोले, विश्वनाथ लाडक्या डोले यांना लाडक्या डोले, रघुनाथ लाडक्या अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन पडळकर करत आहेत.

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट