घरपालघरमलनि:सारण प्रक्रिया केंद्र बंदप्रकरणी महापालिका व एमपीसीबीवर गुन्हे दाखल करा

मलनि:सारण प्रक्रिया केंद्र बंदप्रकरणी महापालिका व एमपीसीबीवर गुन्हे दाखल करा

Subscribe

मीरा- भाईंदर महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मीरा-भाईंदर काँग्रेसतर्फे महापालिकेच्या मलनिःसारण केंद्राच्या घोटाळ्यांच्या पुराव्यांसह तक्रारी केल्या आहेत.

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने सुमारे ७०० कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधलेल्या भूमिगत गटार योजनेतील केवळ दोन मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्प ५० टक्के क्षमतेनेच सुरू आहेत. उर्वरित केंद्रे बंद किंवा अपूर्ण आहेत. पालिका अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या भ्रष्ट संगनमताने प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट खाडी व समुद्रात सोडले जात असल्याने पालिका व एमपीसीबी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली आहे.

मीरा- भाईंदर महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मीरा-भाईंदर काँग्रेसतर्फे महापालिकेच्या मलनिःसारण केंद्राच्या घोटाळ्यांच्या पुराव्यांसह तक्रारी केल्या आहेत. पालिका व एमपीसीबीच्या निदर्शनास आणून देऊनसुद्धा दोन्ही विभागांचे अधिकारी नागरिकांच्या आरोग्याशी व पर्यावरणाशी खेळ करत आहेत. मलमूत्राचे घातक सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट खाडी, समुद्रात व कांदळवन क्षेत्रात तसेच नाल्यांत सोडले जात आहे. एमपीसीबी प्रदूषण व पर्यावरणाचा नाश होत असताना दुसरीकडे तक्रारीनंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी तक्रारदारांसह मलनिःसारण केंद्रांची पाहणी केली. भाईंदर पूर्वेच्या जैसल पार्क आणि मीरारोडमधील सृष्टी येथील मलनिःसारण प्रक्रिया केंद्र पूर्णतः बंद; तर भाईंदर पश्चिम नाझरथ चर्च, खारीगाव येथील केंद्रे अपूर्ण बांधकाम व अपुर्‍या यंत्रसामग्रीमुळे बंद आहेत. सृष्टी म्हाडा येथील केंद्रे रहिवाशांच्या विरोधामुळे बंद आहेत; तर शांती पार्क, नयानगर येथील केंद्रे क्षमतेच्या निम्म्या क्षमतेने सुरू आहेत. उर्वरित ४ मलनिःसारण केंद्रे प्रक्रियेविना दिखाव्यासाठी कार्यरत असून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप सामंत यांनी पाहणीनंतर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -