Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर पालघर कामगार मृत्युप्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा

कामगार मृत्युप्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा

Subscribe

नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रलोक परिसरात इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखान्यात कामगार काम करत होता. तिथे चोरीच्या संशयावरून ११ लोकांनी मिळून मृत कृष्णा तुसामड (३५) यांची हत्या केली होती.

नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रलोक परिसरात इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखान्यात कामगार काम करत होता. तिथे चोरीच्या संशयावरून ११ लोकांनी मिळून मृत कृष्णा तुसामड (३५) यांची हत्या केली होती. त्यात अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष जे. मो. अभ्यंकर यांच्याकडे मृत कामगाराचे वडील व शिष्टमंडळाने तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. निव्वळ चोरीच्या संशयावरून मागील सहा वर्षांपासून त्याच कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराला मरेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नवघर पोलिसांनी ११ जणांना अटक करत खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र त्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही. म्हणून थेट आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांची भेट घेत कारवाई करण्याचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यात ११ आरोपींना अटक केलेली आहे. मृतकाच्या वडिलांना पत्र देऊन जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. ते जसे जात प्रमाणपत्र सादर करतील तसे पोलीस अॅट्रॉसिटी गुन्ह्याचे कलम त्यात लावणार आहेत.
– मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नवघर

- Advertisement -

त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोग, वरळी, मुंबई येथे मृतक कृष्णा याचे वडील पालाराम, भाऊ सतीश, जाती अंत संघर्ष समितीचे सुबोध मोरे, सफाई श्रमिक युनियनचे अध्यक्ष के. नारायण, आयलूचे अॅड. किशोर सामंत यांनी आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांना भेटून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींवर कारवाई करण्यासाठीचे निवेदन दिले. त्याची सुनावणी आयोगाने १९ मे रोजी ठेवलेली आहे. त्यासंदर्भात संबंधित पोलीस ठाणे यांना कळविण्यात येणार आहे.

हेही वाचा –

कुत्रा भुंकतोय, भुंकू दे; अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -