घरपालघर...अखेर तीन वर्षानंतर बससेवा झाली सुरू

…अखेर तीन वर्षानंतर बससेवा झाली सुरू

Subscribe

पालसई येथून पहाटे सहा वाजता ही बस सुटून वसई कडे मार्गस्थ होत होती.त्यामुळे या रस्त्यावरील गावातील विद्यार्थी, नोकरी धंद्यासाठी जाणारे प्रवासी,भाजीपाला दूध वगैरे घेऊन जाणारे शेतकरी वसई विरारला याच गाडीने प्रवास करायचे मात्र हा रस्ता अतिशय नादुरुस्त झाला होता. या रस्त्यावर वाहने चालविणे जिकिरीचे होऊन बसले होते.

वाडा:  निबंवली – पालसई या मार्गावर चालणारी वसई आगाराची बससेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद होती. नादुरुस्त रस्त्यामुळे ही बससेवा बंद करण्यात आली होती. अखेर या रस्त्याची ग्रामस्थांनी श्रमदानातून दुरूस्ती करण्यात आल्याने बससेवा सुरू करून या मार्गावर प्रवास करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे. वाडा तालुक्यातील नांदणी परिसर हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. वसई – निबंवली- कळंभई – पालसई या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून वसई आगाराची बससेवा सुरू होती. रात्री वस्तीला ही बस वसई वरून पालसई येथे येत होती.पालसई येथून पहाटे सहा वाजता ही बस सुटून वसई कडे मार्गस्थ होत होती.त्यामुळे या रस्त्यावरील गावातील विद्यार्थी, नोकरी धंद्यासाठी जाणारे प्रवासी,भाजीपाला दूध वगैरे घेऊन जाणारे शेतकरी वसई विरारला याच गाडीने प्रवास करायचे मात्र हा रस्ता अतिशय नादुरुस्त झाला होता. या रस्त्यावर वाहने चालविणे जिकिरीचे होऊन बसले होते.

रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहनांचे नुकसान होत होते अखेर वसई आगाराने ही बससेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद केली होती. बससेवा बंद झाल्याने येथील विद्यार्थी, नोकरदार व प्रवासी यांची प्रचंड गैरसोय होत होती.अखेर असनस येथील सामाजिक कार्यकर्ते भुपेंद्र पाटील व नागरिकांनी आमदार राजेश पाटील यांच्याकडे आपले गार्‍हाणे मांडले या गार्‍हाणाची दखल घेत आमदार पाटील यांनी वसई आगाराकडे पत्रव्यवहार करून बससेवा सुरू करण्याची मागणी केली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचीही ग्रामस्थांनी दुरूस्ती केल्याने वसई आगाराने बंद असलेली बससेवा सुरू केली. बससेवा सुरू केल्याने येथील प्रवाशांना दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील व वसई आगाराचे आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -