घरपालघरअखेर वाडा आगारातून बससेवा सुरु

अखेर वाडा आगारातून बससेवा सुरु

Subscribe

एक महिन्याच्या संपानंतर वाडा आगाराचे दोन चालक व दोन वाहक कामावर हजर झाल्याने दोन बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावल्या.

एक महिन्याच्या संपानंतर वाडा आगाराचे दोन चालक व दोन वाहक कामावर हजर झाल्याने दोन बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावल्या तर शुक्रवारपर्यंत आणखी चार वाहक व चार चालक कामावर रुजू झाल्याने एकूण सहा बस ग्रामीण भागाच्या फेर्‍या मारत असून एका दिवसात २४ फेर्‍या होत असल्याचे येथील वाहतूक नियंत्रक महेश पष्टे यांनी सांगितले. बुधवार, १ डिसेंबरपासून सर्व शाळा व महाविद्यालये चालू झाली असून बस बंद असल्याने विध्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. हे टाळण्यासाठी बस चालू करण्याची पालकांकडून मागणी होत आहे. तर वाड्यातील शाळा व महाविद्यालयात शिकणारे विध्यर्थी हे बहुतेक ग्रामीण भागातून येत असल्याने या सहा बस चालू झाल्याने काही प्रमाणात त्यांचीही गैरसोय टळल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधान व आनंद दिसून येत आहे.

राज्य परिवहनच्या कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रवाशी, चाकरमानी व विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, वाडा आगाराच्या कामावर रुजू झालेल्या सर्व कर्मचार्‍यांचे स्वागत. इतरही कर्मचार्‍यांनी कामावर हजर राहून विद्यार्थी व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी.
– किरण थोरात, सचिव, वाडा तालुका प्रवाशी संघटना

- Advertisement -

वाडा आगाराचे व्यवस्थापक मधुकर धांगडा यांनी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन केल्याने दोन-दोन कर्मचारी कामावर रुजू होत असून येत्या काही दिवसात जास्तीत जास्त कर्मचारी कामावर हजर होतील, अशी अपेक्षा आगार व्यवस्थापक धांगडा यांनी व्यक्त केली आहे. वाडा तालुक्यातील सापना(बु.) हे गाव महामार्गापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर असून रस्त्यावरील काही भाग निर्मनुष्य असल्याने मुल-मुली चालत येण्यास घाबरतात. गावातून जवळपास चाळीस विद्यार्थी रोज वाड्यातील शाळेत येत असल्याने त्यांना रोज गाडी भाड्यासाठी रोख रक्कम द्यावी लागत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कधी कधी ते शक्य होत नाही. तरी प्रशासनाने या विध्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करून आमच्या गावासाठी सकाळची एकतरी बस सुरू करावी, अशी मागणी सापणे येथील १०-१२ महिलांनी एकत्र येऊन व्यवस्थापकांकडे केली आहे.

हेही वाचा –

ठाणे खाडी क्षेत्राला मान्यता मिळाल्यास राज्यातील हे तिसरे रामसर क्षेत्र असेल – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -