घरपालघरखाण्याचे आमिष दाखवून अखेर माकडाला पकडले

खाण्याचे आमिष दाखवून अखेर माकडाला पकडले

Subscribe

शेवटी एका मारुती व्हॅनमध्ये खाण्याचा पदार्थ ठेवला. ते माकड खाण्यासाठी आत गेल्यावर व्हॅनचा दरवाजा बंद करून माकडाला पकडले.

डहाणू: येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी विव्हळवेढे येथे मंदिराच्या मागील बाजूस गेल्या दोन तीन दिवसांपासून एका माकडाने दहशत माजवली होती. दर्शनाकरिता येणार्‍या भाविकांच्या वाहनांचे हा माकड नुकसान करत होता.शिवाय भाविकांच्या सामानाची सुद्धा नासधूस करत होता. शेवटी महालक्ष्मी ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी डहाणूतील वाईल्ड लाईफ संस्थेतील अधिकारी वर्गाला फोन करुन सदर माहिती दिली. त्यानंतर हार्दिक सोनी, अंचाल मनियार, प्रवेश तांडेल, एरीक ताडवाला हे कर्मचारी तिथे पोहोचले.त्यांनी माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते माकड काही हाती लागेना. शेवटी एका मारुती व्हॅनमध्ये खाण्याचा पदार्थ ठेवला. ते माकड खाण्यासाठी आत गेल्यावर व्हॅनचा दरवाजा बंद करून माकडाला पकडले.

 

- Advertisement -

मंकी गँगची दहशत

महालक्ष्मी विव्हळवेढे येथे गडावर अनेक लहान- मोठे माकडांचे कळप रहात असून गडावर जाणारे भाविक माकडांना खाण्यासाठी पदार्थ देत असल्याने माकडांचा जत्था जमलेला असतो. अनेक वेळा भाविकांचे समान पळविले जाते. त्यात काही वेळेला एखादे माकड रस्ता चुकून गडाखाली उतरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -