घरपालघरअखेर कान्द्रेभुरे शाळेला मिळाले शिक्षक; ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

अखेर कान्द्रेभुरे शाळेला मिळाले शिक्षक; ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

Subscribe

पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्वेकडील आयएसओ मानांकित शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, यासाठी ग्रामस्थांचा दीड वर्षांपासून संघर्ष सुरूच होता. शिक्षण विभागाच्या अन्यायकारक धोरणामुळे शाळेची मुख्यशिक्षिका जागृती चौधरी यांचे १५ दिवसांचे धरणे आंदोलन व पालकांचे शाळा बंद आंदोलन होऊनही शाळेला इतर कायमस्वरूपी शिक्षक मिळत नव्हते. अशातच मुख्य शिक्षिका रजेवर गेल्याने शाळेला तात्पुरता शिक्षक न देता कायमस्वरूपी शिक्षक द्यावा, अन्यथा शाळेला कायमच बंद करा, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. यासंदर्भात, दैनिक आपलं महानगरनेही ग्रामस्थांच्या लढ्याला सातत्याने बातमीद्वारे प्रकाशित करून शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात वाचा फोडल्यामुळे अखेर पालघर शिक्षण विभागाने शाळेला दोन शिक्षक दिल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या कांद्रेभुरे गावातील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळेला इतर कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्याने संतप्त शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून २४ फेब्रुवारी २०२२ रोजी टाळे ठोकण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे विद्यार्थी शाळेबाहेर राहून शिक्षणापासून वंचित झाले होते. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण सभापती ज्ञानेश्वर सांबरे व जिल्हा परिषद सदस्य मनीषा निमकर यांनी शाळेला भेट देऊन पालकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच येत्या दोन दिवसात शाळेला एक शिक्षक मिळवून देऊ, असे सांबरे यांनी पालकांना आश्वासन दिल्यानंतर शाळेचे टाळे उघडण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानंतर केवळ तीनच दिवस शाळेला तात्पुरता शिक्षक मिळाल्याने मुख्य शिक्षिका जागृती चौधरी यांनीच शाळा सांभाळली होती. मात्र, तब्येत बरी नसल्याने त्या शिक्षिका रजेवर गेल्या. त्यांच्या अनुपस्थितही शाळेला कायमस्वरूपी शिक्षक न देता आलटून-पालटून तात्पुरते शिक्षकच दिले जात होते. हे शिक्षक शाळेची इतर कोणतीच जबाबदारी उचलत नसल्याने पालघरच्या शिक्षण विभागाने शाळेला किमान मुख्य शिक्षिका रजेवर आहेत, तोवर तरी जबाबदार असा कायमस्वरूपी शिक्षक द्यावा, अन्यथा शाळा बंद करून टाकावी, अशी आक्रमक भूमिका १६ मार्च रोजी संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती. तसेच त्या संदर्भातील बातमी दैनिक आपलं महानगरमध्ये प्रकाशित झाली होती. अखेर या सर्वांची पालघर शिक्षण विभागाने दखल घेऊन शाळेला दोन शिक्षक दिल्याने शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालकांनी आनंद व्यक्त केला.

हेही वाचा – 

ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी; उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील कारवाईवर संजय राऊत संतापले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -