Eco friendly bappa Competition
घर पालघर ...अखेर तरुणीच्या मृत्युचे गूढ उकलले

…अखेर तरुणीच्या मृत्युचे गूढ उकलले

Subscribe

अखेर 15 मे रोजी येथील जंगलात तिचा मृतदेह एका झाडाला लटकत असताना दिसला.त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला

वाडा:  तालुक्यातील कापरी या गावची रहिवासी असलेल्या दर्शना धोडी या तरूणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तिला दिवसही गेले होते. त्यानंतर तो तरुण तिच्याशी लग्न करण्यास तयार नसल्याने त्या तरूणीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून तरूणीचा प्रियकर गणेश खरपडे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. तालुक्यातील कापरी येथील रहिवासी असलेली दर्शना धोडी (वय 22) ही तरुणी येथीलच एका फार्म हाऊसवर कामाला होती. ती गेल्या 9 मे या तारखेपासून कामावरून घरी परतलीच नाही. ती गायब होती. घरच्यांनी तिची शोधाशोध केली असता ती सापडली नव्हती.

अखेर 15 मे रोजी येथील जंगलात तिचा मृतदेह एका झाडाला लटकत असताना दिसला.त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता सोनाळे या गावातील तरूण गणेश खरपडे या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. हे दोघे एकमेकांच्या घरीही जात असत आणि दोघे लग्न करणार होते. गणेशपासून दर्शना हिला दिवसही गेले होते. त्यानंतर गणेशने तिला औषध देऊन तिचा गर्भपात केला होता. परंतु, दर्शनाने गणेशकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र गणेश त्याकडे दुर्लक्ष करू लागल्याने दर्शनाच्या लक्षात येताच तिने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गणेश खरपडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हिम्मतराव सरगर यांनी केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -