घरपालघरअखेर त्या १९ गावांची पाणी प्रतीक्षा संपली

अखेर त्या १९ गावांची पाणी प्रतीक्षा संपली

Subscribe

झांझरोळी धरणाच्या दुरुस्तीमुळे १९ गावांचा पाणीपुरवठा गेले तीन आठवडे बंद होता. या तीन आठवड्यात सुमारे लाखभर नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागला.

झांझरोळी धरणाच्या दुरुस्तीमुळे १९ गावांचा पाणीपुरवठा गेले तीन आठवडे बंद होता. या तीन आठवड्यात सुमारे लाखभर नागरिकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागला. यावेळेस वेगवेगळ्या घटकांद्वारे बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा सुरू होता. या समस्येने गंभीर रूप धारण केल्यावर लोकप्रतिनिधींनी त्यात लक्ष घालून अखेर तीन आठवड्यानंतर १९ गावांचा पाणीपुरवठा सुरू करून गेल्या अनेक दिवसांपासून या गावातील पाणीटंचाई जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून दूर झाली आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची तहान भागणार आहे. सध्या तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे.

झांझरोळी धरणाची दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात येईल, असे पत्र पाटबंधारे विभागाकडून जिल्हा परिषदेस फार अगोदर देण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषद प्रशासनास याबाबत गंभीर नसल्याचे या घटनेवरून दिसत आहे, हे पत्र मिळाल्यावर जिल्हा परिषदेने आराखडा तयार करून या गावांना यावेळेस कोणत्या पद्धतीने पाणीपुरवठा करता येईल. याचे नियोजन करणे आवश्यक असताना तसे अधिकारी वर्गाकडून करण्यात आले नाही. अधिकारी वर्गाच्या नाकर्तेपणामुळे १९ गावातील सुमारे लाखभर लोकांना तीन आठवडे पाण्यापासून वंचित राहावे लागले.

- Advertisement -

त्या १९ गावांमध्ये पाणी टंचाई असताना आम्ही गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला. टंचाईग्रस्त गावातील सरपंचाची सभा घेतली. तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून धरणस्थळी बैठक घेतली. तिथे पुन्हा ही योजना कार्यान्वित करण्यासाठी नियोजन केले. त्यावेळेस सक्शन पंप हायड्राची गरज होती. ते आणून दिले व ही योजना पुन्हा आम्ही कार्यान्वित केली. येथील गावकऱ्यांना लोकप्रतिनिधींची गरज होती. तेव्हा उद्घाटनासाठी आलेले लोकप्रतिनिधी झोपले होते का, आज बटन दाबून श्रेय घेण्यासाठी कसे काय उपस्थित राहिले.
– राजेश पाटील, आमदार, बोईसर विधानसभा

याबाबत बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या मनीषा निमकर व उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायत माजी उपसरपंच राजेश (बंटी) म्हात्रे यांच्या प्रयत्नाने व समाजातील इतर घटकांनी गावांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी शक्य होईल. तिथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यावेळी समाजातील इतर घटकही पाणी पुरवण्यासाठी पुढे सरसावल्याचे दृश्य दिसत होते. ज्यांना खऱ्या अर्थाने ही परिस्थिती सांभाळायची होती. त्यावेळेस जिल्हा परिषद हाताची घडी तोंडावर बोट या अवस्थेमध्ये पहावयास मिळाली होती. या गावांना टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था झाली नसती तर जिल्हा परिषदेने काय केले असते, याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. तीन आठवड्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून हळूहळू तो सर्व गावांमध्ये सुरू करण्यात येईल. दातिवरेसारख्या शेवटच्या गावापर्यंत जर पाणी जास्त दाबाने पोहोचू शकले नाही, तर तिथे टँकरने पाणी पोहोचवण्यात येईल. कोणालाही पाण्यापासून वंचित ठेवण्यात येणार नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांनी बोलताना सांगितले.

- Advertisement -

या समस्येने उग्र रूप धारण केल्यावर बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी झांझरोळी धरणाशी संलग्न असलेल्या गावातील सरपंच ग्रामसेवक यांची पाणीपुरवठा विषयक नियोजन सभा ४ मे रोजी सफाळे येथील देवभूमी हॉल येथे बोलवली होती. त्यानंतर १९ गावातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित खात्याचे अधिकारी यांना बोलावून धरणावर जाऊन पाहणी केली. तसेच सर्व ग्रामपंचायतींना लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकून काम करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्यावर त्याच्या उद्घाटनासाठी खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा – 

तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर कोथळा काढण्याचा अधिकार,संजय राऊतांचा भाजपला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -