घरपालघरअखेर त्या १७ गावांचा पाणीपुरवठा झाला सुरळीत

अखेर त्या १७ गावांचा पाणीपुरवठा झाला सुरळीत

Subscribe

महावितरणच्या १७ लाख ७० हजारांच्या थकीत वीजबिलपोटी १७ गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने गेल्या काही दिवसांपासून या गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता.

महावितरणच्या १७ लाख ७० हजारांच्या थकीत वीजबिलपोटी १७ गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने गेल्या काही दिवसांपासून या गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. यासंदर्भात आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री व जिल्हा परिषद सदस्या मनिषा निमकर, माजी उपसरपंच राजेश म्हात्रे, समीर म्हात्रे यांनी मंगळवारी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी थकीत वीजबिलातील ३ लाखांचा डीडी अधिकाऱ्यांना देण्यात आला. तसेच तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करून गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी चर्चा केली. या चर्चेनंतर १७ गाव पाणीपुरवठा योजनेचा वीजप्रवाह सुरू केल्याने मंगळपासून गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

सफाळ्यासह १७ गावांमधील अनेक नळजोडणी धारकांना नियमित पाणीपुरवठा होत असतानाही पाणीदेयके भरलेली नाहीत. त्यामुळे सफाळे करवाळे येथील होणारा पाणीपुरवठा १७ लाख ७० हजार थकबाकी विजेचे बिल भरु न शकल्यामुळे १७ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. थकबाकीदार ग्राहकामुळे प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्यांना मात्र मागील काही दिवसात नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

- Advertisement -

या योजनेत सफाळेसह एकूण १७ गावे व अनेक पाडे समाविष्ट असून २५ हजारहून अधिक कुटुंबे योजनेचा लाभ घेतात. येथील ग्रामपंचायत अंतर्गत अंदाजे चार हजारहून अधिक नळजोडण्या आहेत. परंतु येथील बहुसंख्य जोडणीधारक ग्रामपंचायतीला पाण्याची देयके नियमित भरत नसल्याने थकबाकी झाली. त्याचप्रमाणे १७ गावांच्या ग्रामपंचायतमधील ठराविकच ग्रामपंचायत पाणीपट्टी देत आहेत. त्यामुळे विजेची थकबाकीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाने ग्राहकांना सूचना व नोटीस दिल्या. मात्र तरीही थकबाकी दराने पाणी देयके न भरल्याने सफाळे ग्रामपंचायत वीजबिल भरू शकली नाही. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित केला होता.

हेही वाचा –

युद्धाचे ढग! रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले; आता अमेरिका, पाश्चात्य देशांची भूमिका काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -