घरपालघरचोरट्या गौण खनिजांवर कोटींचा दंड

चोरट्या गौण खनिजांवर कोटींचा दंड

Subscribe

पालकमंत्री दादा भुसेंकडून तलाठ्याचा सत्कार

बोईसरच्या पूर्वेस असलेल्या लालोंढे तलाठी सज्जेच्या कार्यक्षेत्रमध्ये मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होते. त्यातून चोरट्या पद्धतीने गौण खनिजांचे होणाऱ्या वाहतूकीवर दंडनीय कारवाई करून कोटींचा महसूल जमा करणारे तलाठी संजय चुरी यांचा जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री ना.दादासाहेब भुसें यांनी सत्कार केला आहे. तलाठी संजय चुरी यांनी या परिसरात चोरट्या पद्धतीने होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीला पकडून एक कोटी पाच लाखाची दंडनीय करवाई केली आहे.

२०१४-२०१५   मध्ये ०६ लक्ष ६९ हजार ४४०,
२०१५-२०१६   मध्ये २४ लक्ष ३६ हजार ७८७,
२०१६-२०१७   मध्ये १७ लक्ष ५६ हजार ३५६,
२०१७-२०१८   मध्ये १९ लक्ष ४१ हजार ४५८,
२०१८-२०१९   मध्ये १८ लक्ष ०४ हजार ४१९,
२०१९-२०२०   मध्ये ०२ लक्ष २९ हजार ८००,

- Advertisement -

असे एकूण  ९५ लक्ष १३ हजार ७० रुपये तर वीटभट्टी वर गौण खनिज बाबत दंडनीय कारवाईत १० लक्ष ७२ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहे. असे एक कोटी ५ लक्ष ८५ हजार ५७० रुपयेचा दंड स्वरूपाने जिल्ह्यात सर्वाधिक महसूल लालोंढे सज्जाने गोळा केले आहे.याची दखल जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घेऊन सत्कार केला आहे. दंडनीय कारवाई करून शासकीय तिजोरीत सर्वाधिक रक्कम जमा करणाऱ्या तलाठीपैकी लालोंढे सज्जेचे संजय चुरी एक बनले आहेत. त्यांनी गेल्या कार्यकाळात चोरट्या गौण खनिजांच्यावर दंडनीय कारवाई करणाऱ्या पथकात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

लालोंढे मधील निहे, नागझरी, किराट आणि अन्य परिसरातील अनधिकृतपणे चालणारे खदानी कायदेशीर कारवाई करून बंद केली आहेत.त्यामुळे येथील बेकायदेशीर खदानीतील चोरटी उत्खनन आणि वाहतुकीवर पूर्णपणे नियंत्रण आले आहे.नियोजित झालेल्या मुंबई वडोदरा महामार्ग च्या रेखांकित परिसरात सुरू असलेली सर्व अनधिकृत खदानीचे सर्वेक्षण करून लालोंढे तलाठी सज्जाने बंद केल्याने चोरटी गौण खनिज उत्खनन प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -