घर पालघर नायगाव पोलिसांची चेन्नईत फायर कामगिरी

नायगाव पोलिसांची चेन्नईत फायर कामगिरी

Subscribe

हे रक्तचंदन हैदराबाद येथून न्हावा शेवा बंदरामार्गे (मुंबई) दुबई येथे पाठवण्यात येणार होते.

वसई : वालीव पोलिसांनी कामण पोलीस चौकीच्या हद्दीत डिसेंबर २०२२ मध्ये केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा
रक्तचंदनाचा साठा जप्त केला होता. यातील फरार आरोपीला नायगाव पोलिसांच्या पथकाने चेन्नईतून अटक केली आहे.
फारुख बिलाल असे या आरोपीचे नाव असून, या प्रकरणी अटक केलेला तो सहावा आरोपी आहे.
पोलिसांनी २६ डिसेंबर २०२२ ला कामण गावाजवळ रक्तचंदनाची बेकायदा वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई केली होती. या वेळी ट्रक तसेच कोट्यवधी रुपयांचे सुमारे साडेपंधरा टन रक्तचंदन जप्त केले होते. हे रक्तचंदन हैदराबाद येथून न्हावा शेवा बंदरामार्गे (मुंबई) दुबई येथे पाठवण्यात येणार होते.

या बाबतची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे हवालदार महेश बोडके यांना मिळताच कांद्याच्या गोण्याखाली लपविलेले रक्तचंदनाचे ओंडके जप्त करण्यात आले होते. दुबई व अन्य देशात या चंदनाची तस्करी करणारा आरोपी फरार होता. हा आरोपी चेन्नई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, शेखर पवार, दिगंबर यांचे काळे पथक चेन्नईला रवाना झाले होते. आरोपीला तेथून पडकण्यात आले. बिलाल याला नायगाव पोलिसांनी एका बंगल्यातून पकडले. त्या वेळी त्याने पोलिसांना दमदाटी करण्यासाठी काही नागरिक गोळा केले होते. पोलीस वाहनातून त्याला घेऊन येत असताना काही वाहनांचा ताफाही पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करीत होता. त्यामुळे या कारवाईत अडथळे निर्माण झाले होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -