भाईंदर :- मीरारोडमध्ये एका कुटुंबाने दत्तक घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. धर्मपरिवर्तनासाठी देखील दबाव टाकत असल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कोरोना महामारीच्या काळात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तर आईने जानेवारीत आत्महत्या केली होती. त्यामुळे पीडित मुलगी व तिचे दोन भाऊ अनाथ आश्रमात राहात होते. दरम्यान, मीरारोड येथे राहणार्या एका कुटुंबाने पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान भावांना दत्तक घेतले होते. एप्रिल २०२३ ते ८ ऑगस्ट सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान नानी शाहीन खान, मावशी नुझत मर्चंट व मावशी निखत मर्चंट यांनी आपसात संगनमत करुन पीडितेला आणि तिचा भाऊ, मावस बहीण हिला त्यांच्या मर्जीशिवाय जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यास सांगितले.
पीडितेच्या भावास गोश व मटण खाण्यास सांगितले. तसेच पीडिता ही क्लासला गेल्यानंतर तिच्या भावाला देखील त्रास देण्यात आला,असा आरोप पीडितेने केला आहे.तसेच ऐकले नाही तर पुन्हा सगळ्यांना परत अनाथ आश्रमात पाठविण्याची धमकी देत होते.कहर म्हणजे पीडितेचा मामा अबुझईद खान याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ती झोपलेले असताना तिच्यासोबत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलेले आहे.तसेच ८ ऑगस्टला दत्तक घेतलेल्या कुटुंबातील १९ वर्षीय आरोपीने पीडिता घरात झोपली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडितेने घरातून निघून जात शेवटी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी शाईन रईस खान, अबूईद खान, तुझत खान व निखत मर्चंट यांच्या विरोधात पोलिसांनी बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्या प्रकरणी कलम ३७६, ३७६ (२) (एन) २९८, ५०६, ३४ सह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील १९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.