घरपालघरवसईतल्या मच्छीमार महिलांना डोंबिवलीत मारहाण

वसईतल्या मच्छीमार महिलांना डोंबिवलीत मारहाण

Subscribe

तरीही पीडित मच्छीमार महिलांना न्याय मिळालेला नाही. म्हणूनच डोंबिवलीतील मच्छीमार महिलांच्या या दुष्कृत्याविरोधात वसईत संतप्त वातावरण आहे.

वसईः वसईतील मच्छीमार महिलांना डोंबिवली येथे मारहाण केल्याच्या निषेधार्थ सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वसई जनरल लेबर युनियन मार्फत आयोजित सदर मोर्चामध्ये सर्व मच्छीमार संघटना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सामील झाले होते. वसईतील मच्छीमार महिला कल्याण डोंबिवली, ठाणे, पनवेल, बदलापूर, गणेशपुरी, वज्रेश्वरी, अंबाडी इतरत्र मासळी विकण्यासाठी अनेक वर्षापासून जातात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. मागील काही दिवसांपासून डोंबिवली येथे मासळी व्यवसाय करणार्‍या वसईतील महिलांना मज्जाव केला जात आहे. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्यात आले. त्यांच्या मासळीमधे फिनाईल, अ‍ॅसिड टाकून नुकसान केले जाते. या वादामुळे वसईतील मच्छीमार महिलांना डोंबिवलीत व्यवसाय करणे कठिण झाले आहे. डोंबिवली भागातील मच्छिमार महिलांनी वसईतील मच्छीमार महिलांना केलेल्या मारहाणीच्या अनेक तक्रारी तेथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत. तरीही पीडित मच्छीमार महिलांना न्याय मिळालेला नाही. म्हणूनच डोंबिवलीतील मच्छीमार महिलांच्या या दुष्कृत्याविरोधात वसईत संतप्त वातावरण आहे.

वसईतील मच्छिमार महिला डोंबिवली परिसरात व्यवसाय करण्यासाठी असुरक्षित आहेत. या गंभीर समस्येबाबत शासकीय यंत्रणा व विविध संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसिलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सागरी कोळी सोसायटीचे अध्यक्ष दयानंद कोळी, माजी नगरसेवक संजय कोळी, सतीश गमजा, मारुती झुंजुरके, कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदिया, जनरल लेबर संघटनेच्या उपाध्यक्षा अभिलाशा वर्तक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

सध्या मासळीचा तुटवडा सुरू असतानाही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलेली नाही. मात्र डोंबिवलीतल्या होणार्‍या बेकायदेशीर प्रकाराबाबत कारवाई न झाल्यास मच्छीमार महिला उग्र भूमिका धारण करतील. यातून मोठा प्रमाद घडेल. या महिलांमुळे कुटुंबाचे पालनपोषण चालते त्यांनाच रोजगार नसेल तर शेवटी तहसील प्रशासनाकडे दुष्काळ भरपाईची मागणी करावी लागेल. त्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने सहाय्य करण्याची मागणी संजय कोळी यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -