घरपालघरपालघरमधील दुसरी लस मात्रेचे पाच हजार लाभार्थी बेपत्ता

पालघरमधील दुसरी लस मात्रेचे पाच हजार लाभार्थी बेपत्ता

Subscribe

कोरोना लसीकरता ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लशींची दोन्ही मात्रा झाल्याशिवाय नव्याने पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरू करू नये, अशी राज्य शासनाची सूचना आहे.

कोरोना लसीकरता ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लशींची दोन्ही मात्रा झाल्याशिवाय नव्याने पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरू करू नये, अशी राज्य शासनाची सूचना आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील लसीकरणाची दोन्हीही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या एक लाखाच्या घरात असून अद्याप दोन लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. यातील सुमारे पाच हजार नागरिकांच्या नोंदणीत त्रुटी आढळल्याने त्यांच्या शोध घेणे प्रशासनाला कठीण जात आहे.

पालघर जिल्ह्यात २ मार्चपासून लसीकरणास सुरुवात झाली. लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर यांचे प्राधान्यांने लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणास सुरुवात झाली. यामध्ये २५ हजार २१० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून यामध्ये दोन्हीही मात्रा घेणाऱ्यांची संख्या १६ हजार ६८३ आहे. तर २५ हजार ७३१ फ्रन्टलाइन वर्करमध्ये दोन्हीही मात्रा घेणाऱ्यांची संख्या ११ हजार ५२१ आहे. तसेच ४५ वर्षांवरील वयोगटात आतापर्यंत एक लाख ९७ हजार ६९९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये दोन्ही मात्रा घेणाऱ्यांची संख्या ४१ हजार ७६६ आहे. या लसीकरणात दुसरी मात्रा घेण्याचा संपलेला आणि जवळपास आलेल्या कालावधीत सुमारे पाच हजार नागरिक असल्याचे सांगण्यात येते. परंतु त्यांची माहिती अपूर्ण आणि त्यांच्या नोंदणीत काही त्रुटी आढळल्याने त्यांचा शोध लागत नाही. त्यामुळे प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

- Advertisement -

दरम्यान सुरुवातीला लसीची पहिली मात्र दिल्यानंतर २८ दिवसानंतर लशीची दुसरी मात्रा नागरिकांना देण्यात येत होती. ४५ वरील वयोगटातील मार्च महिन्यांत घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस ४२-४५ दिवसांवर वाढवण्यात आली. असे असले तरी कोविन सॉफ्टवेअरमध्ये काळ मर्यादेचे काटेकोर पालन करण्यासाठी तरतूद नसल्याने ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांनी ४० ते ५० दिवसांमध्ये आपल्या लशीची दुसरी मात्रा घेतली. सध्या लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर ८५ दिवसानंतर दुसरी मात्रा घेण्याची नियम १७ मे च्या दरम्यान निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आणखी काही दिवस दुसऱ्या लशीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीमुळे लस उपलब्ध असताना देखील लसीकरण फक्त दुसऱ्या मात्रेसाठी सुरू ठेवल्याने लसीकरण केंद्र जवळपास रिकामी असल्याप्रमाणे दिसत आहेत.

लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे आव्हान

अनेकांनी लशीची पहिली मात्रा घेताना दिलेला मोबाइल क्रमांक चुकीचा असल्यास किंवा लशीची दुसरी मात्रा देताना दुसरा अन्य नंबरद्वारे नोंदणी केली असल्यास लसीकरण प्रक्रिया अपूर्ण असल्याचे पोर्टलवर दिसत आहे. त्याचप्रमाणे करोनासदृश्य लक्षण असताना लस घेतलेल्या व्यक्तींना आजाराचा संसर्ग झाल्याने अशा व्यक्तींना पुढील तीन महिने लस न घेण्याचा सल्ला दिल्याने अशा व्यक्ती देखील लसीकरणाच्या प्रक्रियेस अपूर्ण राहण्यास कारणीभूत ठरत आहे. काही नागरिकांचे दिलेले संपर्क क्रमांक बंद असल्याचे किंवा संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. ज्या केंद्रावर नागरिकाने पहिली लस घेतली. परंतु दुसरे लस घेण्यास आले नाहीत, अशा नागरिकांचा शोध घेणे शासकीय अधिकाऱ्यांसमोर आव्हानात्मक ठरत आहे.

- Advertisement -

प्रशासनासमोर पेच

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी जिल्ह्यकडे सध्या दहा हजारापेक्षा अधिक लशीची मात्रा उपलब्ध आहे. तरीही पहिली मात्रा घेतलेल्या चार हजारपेक्षा अधिक नागरिकांनी दुसरी लस देण्यासाठी काळ वैद्यता उलटली असली तर दुसरी मात्रा घेतले नसल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही मात्रा पूर्ण झाल्याशिवाय नव्याने पहिल्या मात्रेचा लसीकरण सुरू न करण्याचे सूचना राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे नव्याने लसीकरण स्थगित ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा लसीकरण विभागातर्फे सांगण्यात आले. सुरू असलेल्या लसीकरणाच्या दुसरा मात्रेसाठीच्या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शासकीय अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा –

राष्ट्रपतींनी १० अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -