घरपालघरअंबाडीत शासकीय औषधे कचर्‍याच्या ढिगार्‍यात

अंबाडीत शासकीय औषधे कचर्‍याच्या ढिगार्‍यात

Subscribe

वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कावळे आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत अवगत केले. पंचनामा करत औषधे शासकीय वैद्यकिय अधिकार्‍यांनी ताब्यात घेतली आहेत.

वसईः अंबाडी – दिघाशी रस्त्यालगत असलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यात औषधांचा साठा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडला आहे. ही औषधे म्हणजे शासनाच्या आरोग्य विभागातून देण्यात येणार्‍या फॉलीक असिडच्या गोळ्या आहेत. याबाबत माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार आणि सुनील लोणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कावळे आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत अवगत केले. पंचनामा करत औषधे शासकीय वैद्यकिय अधिकार्‍यांनी ताब्यात घेतली आहेत.

शासनाचा अ‍ॅनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत बालक सदृढ आणि अ‍ॅनिमिया मुक्त जन्माला यावे म्हणून लोह आणि फॉलीक सिड तसेच पोषण आहार देण्याचे उपक्रम जाहिरातीत पाहायला मिळतात. प्रत्यक्ष ग्राऊंड रियालिटी मात्र भयावह आहे. असाच प्रत्यय मंगळवारी अंबाडीत येथे आला. अंबाडी गावातील नाझिब धुरू या तरुणाने प्रमोद पवार यांना माहिती देऊन रस्त्याच्या कडेला औषधे पडलेले असल्याचे सांगितले. पवार यांनी घटनास्थळ गाठत शासकीय अधिकार्‍यांना पोलिसांना ही गोष्ट लक्षात आणून दिली.

- Advertisement -

गोळ्या ज्याठिकाणी पडलेल्या होत्या हे अंतर अंबाडी ग्रामीण रूग्णालय ( सध्या फक्त ओपीडी सेवा) पासून केवळ पाचशे मीटर अंतरावर आहेत. या गोळ्या हिंदुस्थान लॅबोरेटरी पालघर याठिकाणी तयार होउन शासनाकडे आल्यानंतर त्यासंबंधित जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी विभागात दिले जाते. आता या गोळ्या नक्की कुणाच्या?. अंबाडी ग्रामीण रुग्णालयाल की अजून कुठे याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबात श्रमजीवी संघटनेने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली असल्याचे प्रमोद पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -