Eco friendly bappa Competition
घर पालघर वन जमिनीवर हॉटेल्स अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

वन जमिनीवर हॉटेल्स अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

Subscribe

त्यानंतर बर्‍हाणपूर फाट्यावरील अमृत तांबडा यांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले.

मनोर: मुंबई -अतिक्रमण धारकांनी वनविभागाच्या जागेत केलेली अतिक्रमणे दोन आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतरही हटवली नसल्याने शनिवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला.बांधकामे हटवण्यासाठी मनोर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील वनपाल,वनरक्षक आणि कासा वनपरिक्षेत्रातील कर्मचार्‍यांची कुमक तैनात करण्यात आली होती. कारवाईच्या सुरुवातीला चिल्हार फाट्यावरील चंद्रकांत झाटे आणि राजू बुकले यांनी केलेले बांधकाम हटवण्यात आले.त्यानंतर बर्‍हाणपूर फाट्यावरील अमृत तांबडा यांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले. कासा येथील सहाय्यक वनसंरक्षकांच्या कार्यालयात अतिक्रमणाच्या सुनावण्या पार पडल्या.यावेळी अतिक्रमण धारकांनी वनविभागाच्या जागेत केलेले अतिक्रमण आणि त्याबाबतच्या शासकीय पुराव्यांची कागदपत्रांची पडताळणी केली.सोबत अतिक्रमण धारकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सहायक वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार दोन आठवड्यांच्या कालावधीत अतिक्रमण आणि बांधकामे हटवण्याचे निर्देश दिले होते.

अहमदाबाद महामार्गाच्या आच्छाडपासून घोडबंदरपर्यंतच्या वनविभागाच्या जागेत मोठ्या संख्येने अतिक्रमणे करण्यात आली आहेत.अतिक्रमण केलेल्या जागेत व्यावसायिक बांधकामे करून ढाबे आणि हॉटेल्स चालवली जात आहेत. विधानपरिषदेचे आमदार रमेश पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी पावसाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवर कारवाईच्या निर्देशानुसार मनोर वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील महामार्गालगतच्या वनविभागाच्या जागेतील अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -