घर पालघर आर्किटेक्ट, वकिल, डॉक्टरांच्या नावाने बनावट कागदपत्रे

आर्किटेक्ट, वकिल, डॉक्टरांच्या नावाने बनावट कागदपत्रे

Subscribe

तेही सुरेंद्र शिवदे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण तपासामुळे वसई विरारमधील महाघोटाळा उजेडात आला असून आता अनेक बेकायदा इमारतींची माहिती समोर येऊ लागली आहे.

वसईः विरार पोलिसांनी उघडकीस आणलेल्या अनधिकृत इमारतींमधील सदनिका विकण्यासाठी आर्टिकेक्ट, वकिल आणि डॉक्टरांच्याही बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँका, पतपेढ्या, वित्तिय संस्थांकडून कोट्यवधी रुपयांची कर्जे घेऊन फसवणूक केल्याचाही प्रकार आता उजेडात येऊ लागला आहे. विरार पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सुरेंद्र शिवदे विरारमधील एका अनधिकृत इमारतीचे प्रकरण हाताळत असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ अनधिकृत इमारती बांधून त्यातील सदनिका विकून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. खरे तर अनधिकृत इमारती आणि बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती वसई- विरार महापालिकेला असणे आवश्यक होते. पण, महापालिकेतील अधिकारी-कर्मचार्‍यांचे बिल्डरांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे हा घोटाळा उजेडात न आल्याने महापालिका, महसूल, उपनिबंधक विभागाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचे समोर आले आहे. तेही सुरेंद्र शिवदे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण तपासामुळे वसई विरारमधील महाघोटाळा उजेडात आला असून आता अनेक बेकायदा इमारतींची माहिती समोर येऊ लागली आहे.

या टोळीने सदनिका विकत घेणार्‍यांना कर्ज मिळावे यासाठीही अनेक बोगस कागदपत्रे तयार केली आहेत. त्यात मुंबईतील एका प्रसिद्ध डॉक्टर आणि दोन नामांकित हॉस्पीटलचीही बनावट कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. या हॉस्पीटलमध्ये कामाला असल्याची खोटी पे स्लिप तयार करून वित्तीय संस्था, पतपेढ्या आणि बँकांकडून कर्ज घेतली गेली आहेत. महापालिका आणि सिडकोची बोगस बांधकाम परवानगी बनवण्यासोबतच या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून बँका, पतपेढी आणि वित्तिय संस्थांकडून कोट्यवधी रुपयांची कर्जे घेऊन आर्थिक फसवणूक केल्याचीही माहिती समोर आली आहे. या बनावट कर्जा काही बँका, पतपेढ्या आणि वित्तीय संस्थांचे कर्मचारी सामिल असल्याचाही पोलिसांचा संशय असल्याने तेही आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

- Advertisement -

दिवंगत आर्किटेक्टच्या नावाचाही वापर

पोलीस तपासात अटकेत असलेल्या टोळीने विरारमधील प्रसिद्ध आर्किटेक्ट के.डी. मेस्त्री यांच्या नावाचा वापर करून बनावट बांधकाम परवानगीची कागदपत्रे बनवली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मेस्त्री यांचे २०१६ मध्ये निधन झाले असताना याटोळीने त्यांच्या नावाची बोगस कागदपत्रे, शिक्के, सही याचा वापर करून २०१९ मध्ये बनावट इमारत नकाशा बनवल्याची माहिती उजेडात आली आहे. यावर कहर म्हणजे कागदपत्रांची छाननी आणि इतर आवश्यक कागदपत्रांसाठी विरारमधील दोन सुप्रसिद्ध वकिलांची बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा वापर केला गेल्याचेही तपासात उजेडात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -