घरपालघरउपाध्याय जयंतीच्या परवानगीआडून मेहतांचा वाढदिवस; आयोजकांवर गुन्हा दाखल

उपाध्याय जयंतीच्या परवानगीआडून मेहतांचा वाढदिवस; आयोजकांवर गुन्हा दाखल

Subscribe

माजी आमदार नरेंद्र मेहतांना पुन्हा सक्रीय राजकारणात आणण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी वाढदिवस साजरा केला. त्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या नावाने परवानगी घेण्यात आली होती.

माजी आमदार नरेंद्र मेहतांना पुन्हा सक्रीय राजकारणात आणण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी वाढदिवस साजरा केला. त्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या नावाने परवानगी घेण्यात आली होती. मात्र, वाढदिवसानिमित्ताने गर्दी जमवल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवरच गुन्हा दाखल केला आहे. मीरा भाईंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा राजकारणात सक्रीय होणार असल्याचे शहरभर मोठाले होर्डिंग लावण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे भाजप ज्यांना सर्वोसर्वे मानते त्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या नावाखाली परवानगी घेऊन नरेंद्र मेहता यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला आहे.

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी बलात्काराचा गुन्ह्यानंतर एक अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकारण सोडल्याचे जाहिर केले होते. आता वाढदिवसाच्या निमिताने पुन्हा राजकारणात सक्रीय होण्यासाठी त्यांनी एका कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारो लोकांना एकत्र जमवण्यात आले होते. यावेळी भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते विनामास्क वावरताना दिसून आले होते. याप्रकरणी वाढदिवसाचे आयोजक अण्णा राशीनकार यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जागा मालक किंवा हॉल मालक यांच्यावर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

शहरात झाडांवर, लाईटचे खांब, मुख्य विद्युत वाहिनी रोहित्र्यांवर, नाल्यांवर अतिक्रमण करून बॅनर लावण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी कोविड सेंटरच्या ऑक्सिजन टाकीच्या शेजारीच बॅनरचा सुळसुळाट दिसून आला आहे. याप्रकरणी महापालिकेनी कुठलीही कारवाई केलेली नाही. उलट अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ व उपायुक्त मारुती गायकवाड यांनी कारवाई केली असल्याची खोटी माहिती देऊन महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांची पाठराखण करण्याचे काम केल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड किंवा उपायुक्त मारुती गायकवाड यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी तक्रारी येत असल्याने आणि पत्रकार प्रतिक्रीया विचारत असल्याने आपला मोबाईल बंद करून ठेवला होता.

- Advertisement -

पालिकेच्या विरंगुळा केंद्रात बेकायदा कार्यक्रम


मीरारोडमधील पुनम गार्डन भागात महापालिकेच्या मालकीची इमारत आहे. त्यात तळमजल्यावर जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, तर पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे. ही मालमत्ता महापालिकेची असताना शुक्रवारी रात्री भाजपाच्या स्थानिक नगरसेविका विविता नाईकसह, रितू चतुर्वेदी, बिंदू उपाध्याय, भारती सोमवंशी आदी भाजपा कार्यकर्त्यांनी माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा वाढदिवस महापालिका विरंगुळा केंद्रात साजरा केल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी केक कापण्यास जमलेल्या भाजपाच्या नगरसेविका व कार्यकर्त्यांनी मास्क देखील घातलेला नव्हता. कोरोना नियमांचे उल्लंघन केले गेले. महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता बेकायदेशीर कार्यक्रम केल्याने नागरिकांमधून टीकेची झोड उठत आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा –

Monsoon Update: राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -