घरपालघरमाजी आमदार राजाराम ओझरे यांचे निधन

माजी आमदार राजाराम ओझरे यांचे निधन

Subscribe

पहिल्यांदाच १९७९ साली ते तलासरी पंचायत समितीच्या सभापतीपदी निवडून आले. त्यानंतर सातत्याने चारवेळा सभापतीपदी विराजमान झाले.

डहाणूः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजाराम ओझरे यांचे तलासरी येथील राह्ताय घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची चार मुले , पाच मुली , नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी बारा वाजता वडवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तलासरी तालुका जव्हार मतदारसंघात असताना पाच वर्षे आणि नव्याने तयार झालेल्या डहाणू मतदारसंघात पाच वर्षे म्हणजे सन २००४ ते २०१४ ते आमदार होते. त्यांचा जन्म 1953 साली वडवली येथील गावात झाला. त्यांचे शिक्षण एचएससी पर्यंत झाले.

पहिल्यांदाच १९७९ साली ते तलासरी पंचायत समितीच्या सभापतीपदी निवडून आले. त्यानंतर सातत्याने चारवेळा सभापतीपदी विराजमान झाले. यानंतर ठाणे जिल्हा असताना पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. डहाणू मतदार संघात मापक जिवंत ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.राजाराम ओझरे यांनी कम्युनिस्ट पक्ष , या पक्षाकरता व समाजाच्या भल्याकरता आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. दहा वर्षे जनतेचा आवाज बनून विधानसभेत आवाज उठवणारे ओझरे लाडके नेते होते. शेतकरी आंदोलन , फॉरेस्ट प्लॉटसाठीचा लढा, विविध मोर्चे व आंदोलने यांची धुरा लिलया पेलूत ओझरे यांनी तलासरी , डहाणू , पालघर , जव्हार , विक्रमगड , वसई भागात भरीव कामगिरी केली. त्यांच्या निधनाने समाजाचे, पक्षाचे न भरून निघणारे नुकसान झाले, अशा शब्दात माजी खासदार ल. सी. कोम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -