घरपालघरगुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा प्रकार; माजी आमदार विवेक पंडित यांचा आरोप

गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा प्रकार; माजी आमदार विवेक पंडित यांचा आरोप

Subscribe

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पालघर पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे व्यक्तव्य करणे म्हणजे गुन्ह्यावर पांघरूण घालणाचा प्रकार असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित केला.

मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी घेतलेले पाचशे रुपये फेडण्यासाठी काळू पवार शेतमालकाकडे गडी म्हणून काम करत होता, अशी त्यांची पत्नी सावित्री काळे यांची तक्रार आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाही, अशा प्रकारचे व्यक्तव्य करणे म्हणजे गुन्ह्यावर पांघरूण घालणाचा प्रकार असल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पालघर पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी?, असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे. मालकवर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बायाना) देऊ नये, अन्यथा वेठबिगारीविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील, असा इशारा पंडित यांनी दिला आहे. वेठबिगारांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही पंडित यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी त्यांनी काळू पवार यांनी आत्महत्या केली त्या दिवशी (१३ जुलै) खुप पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गावातच दफनविधी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. शिवाय काळू पवार याला नेहमी दारू पिण्याची सवय होती आणि २ ऑगस्ट रोजी या आत्महत्याविषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधिक्षक शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

२०२० च्या दिवाळी सणाच्या ५ दिवस अगोदर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू (वय १२) याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना काहीच कळले नाही. परंतु, दत्तूच्या अंत्यसंस्कारासाठी पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या शेत मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयांची उसनवारी करावी लागली. त्यावेळी हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता, शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी म्हणून काम करत होता, असे मृत काळू पवार यांची पत्नी सावित्री यांनी आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक शिंदे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे गुन्ह्यावर पांघरून घालण्याचा प्रकार आहे, असा आरोप पंडित यांनी केला आहे.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधिक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असून गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी?, असा सवाल पंडित यांनी उपस्थित केला आहे. आपल्या प्रशासनाने परिस्थिती स्विकारायला पाहिजे. पोलिसांचा हेतू चांगला आहे. मात्र वेठबिगारी पद्धत नाही, असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. ते गुन्ह्याला पाठबळ देण्यासारखे आहे. पोलिसांना कायदा मान्य पाहिजे. त्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे. तसेच, वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे. पोलिसांचा नाही. गुन्ह्यांचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने तटस्थपणे कायद्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे आणि जिल्हा प्रशासनाचे काम आहे. व्यवस्था परिवर्तनाच्या बाजूने पोलिसाची भूमिका असायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने याच्याविरोधी परिस्थिती आहे, असाही आरोप पंडित यांनी यावेळी बोलताना केला.

- Advertisement -

यावेळी मृत काळू पवार यांची पत्नी सावित्री काळू पवार आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. रामदास कोरडे याने आम्हाला मुलाच्या कफनासासाठी पाचशे रुपये दिले होते. नंतर आम्ही त्याला पैसे परत देत होतो. परंतु त्याने परत घेतले नाही. तू गडी म्हणून कामावर येऊन फेड, असे तो म्हणाला. त्यानंतर त्याने एकही रुपया मजुरी दिली नाही. परंतु नंतर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याने कुणा मध्यस्तांच्या मदतीने मला २० हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला, मात्र मी ते घेतले नाही, असे सावित्री पवार यांनी सांगितले.

हेही वाचा –

नारायण राणेंची ‘जन आशीर्वाद यात्रा’ उद्या सिंधुदुर्गात होणार दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -