घरपालघरमीरा -भाईंदरमध्ये मराठी नाटकांचा चार दिवस ’नाट्य महोत्सव’

मीरा -भाईंदरमध्ये मराठी नाटकांचा चार दिवस ’नाट्य महोत्सव’

Subscribe

शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ’एका लग्नाची पुढची गोष्ट ’ हे नाटक होणार आहे . तर १३ नोव्हेंबर रोजी ’ तू तू मी मी’ हे नाटक होणार आहे .

भाईंदर :- आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन व मीरा भाईंदर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात दीपावलीनिमित्त नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. मीरा -भाईंदर शहरातील मराठी नाट्य रसिकांसाठी दिवाळी निमित्त ही मोठी मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे चारही गाजलेली मराठी नाटके असून मोफत प्रवेशिका घेऊन नाटके पाहता येणार आहेत. १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान ४ नाटके आयोजित केली आहेत. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ’एका लग्नाची पुढची गोष्ट ’ हे नाटक होणार आहे . तर १३ नोव्हेंबर रोजी ’ तू तू मी मी’ हे नाटक होणार आहे .

गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी ’तू म्हणशील तसं’ हे नाटक होईल. शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी ’देवबाभळी ’ हे नाटक होईल. चारही नाटकांचे प्रयोग दुपारी ४ वाजता होणार आहेत. या नाटकात सगळे दिग्ग्ज मराठी अभिनेते आहेत. प्रशांत दामले , कविता मेढेकर , अतुल तोडणकर , भरत जाधव , संकर्षण कर्‍हाडे , काजल काटे असे विविध दिग्ग्ज गाजलेले कलाकार या नाटकांच्या निमित्ताने मीरा- भाईंदरमध्ये येणार आहेत. या चारही नाटकांना ज्यांना जायचे आहे, त्यांना मोफत प्रवेशिका मिळविण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालय मंगल नगर , मीरारोड येथे संपर्क करावा लागणार आहे. नाटकाच्या प्रयोगास प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. नाटकांत प्रवेश मोफत आहे. पण अधिकृत मोफत प्रवेशिका प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -